वज्रेश्वरी, ता. ३० (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील लोणाड येथील पुरातन शंकर मंदिर आणि ऐतिहासिक खंडेश्वरी लेणी यांचे शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन व जतन करण्याबरोबरच परिसराचा सर्वांगीण पर्यटन विकास करण्यासाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी देवा ग्रुप संघटनेचे अध्यक्ष सुजित ढोले आणि सचिव तानाजी मोरे यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यटन मंत्री, ठाणे जिल्हाधिकारी तसेच राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले आहे.
लोणाड येथील शंकर मंदिर आणि खंडेश्वरी लेणी हा भिवंडी तालुक्याच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा ठेवा आहे. या वास्तूंचे तातडीने संवर्धन करून त्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शंकर मंदिर आणि खंडेश्वरी लेणी परिसराचा नियोजनबद्ध विकास झाल्यास धार्मिक तसेच ऐतिहासिक पर्यटनाला मोठी चालना मिळू शकते. त्यामुळे सरकारने या परिसरासाठी स्वतंत्र पर्यटन विकास आराखडा तयार करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रस्तावित निधीतून मंदिर आणि लेणींचे पुरातत्त्वीय पद्धतीने संवर्धन व दुरुस्ती, अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे, विद्युत व्यवस्था, आकर्षक प्रकाशयोजना, वाहनतळ, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा, माहिती केंद्र, दिशादर्शक फलक आणि परिसराचे सुशोभीकरण आदी कामे करण्यात यावीत, अशी मागणी आहे.
स्थानिकांना रोजगाराच्या संधी
परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास स्थानिक नागरिक, युवक, महिला बचतगट तसेच छोट्या व्यावसायिकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे केवळ ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन न करता संपूर्ण परिसराचा शाश्वत आणि नियोजनबद्ध पर्यटन विकास करावा, अशी भूमिका ढोले आणि मोरे यांनी मांडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.