चांदिवलीत कावड यात्रेला हजारो भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
घाटकोपर, ता. ३० (बातमीदार) ः चांदिवलीत श्रावण महिन्यानिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या कावड यात्रेला यंदाही हजारो भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला.
शिवसेना चांदिवली विधानसभा क्षेत्राच्या वतीने आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (ता. ३०) कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शीतल तलाव येथून सुरू झालेली ही यात्रा काजूपाडा पाइपलाइनमार्गे श्री शंभो महादेव मंदिरापर्यंत काढण्यात आली. भगव्या वातावरणात निघालेल्या या यात्रेत ढोल-ताशे, डीजेच्या तालावर भाविकांनी सहभाग घेतला. फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
यात्रेत हजारो उत्तर भारतीय महिला भगव्या साड्या परिधान करून घागर व कलश घेऊन सहभागी झाल्या. त्यांनी श्री शंभो महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केला. शेकडो पुरुषांनी भगवे कुर्ते परिधान करून कावड घेतली होती. यात्रेदरम्यान भगवान शंकराच्या दोन भव्य मूर्तींचे देखावे सादर करण्यात आले. तसेच काशी येथून आणलेल्या पवित्र जलाने श्री शंभो महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यात आला.
या वेळी नगरसेविका शैला दिलीप लांडे, युवासेना महाराष्ट्र कार्यकारिणी अध्यक्ष प्रयाग दिलीप लांडे, प्रणव दिलीप लांडे, शाखाप्रमुख नितीन गोखले, शैलेश निंबाळकर, बाबू मोरे, उत्तर भारतीय संघ चांदिवलीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीरामप्रसाद दुबे, महिला तालुकाध्यक्ष सरिता मिश्रा आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.