मुंबई

महाराष्ट्रात अंतराळ, विज्ञान, विज्ञानकथांचा संगम

CD

प्रभादेवी, ता. ३० (बातमीदार) : मनोरंजन, गेमिंग आणि ई-स्पोर्ट्स क्षेत्रातील नोडविन गेमिंगच्या पुढाकाराने राज्य सरकारच्या सहकार्याने ‘स्पेसफेस्ट’ या अंतराळ, विज्ञान आणि विज्ञानकथांना समर्पित महोत्सव होणार आहे. नरिमन पॉईंट येथे झालेल्या कार्यक्रमात या महोत्सवाची घोषणा करण्यात आली.
अंतराळ संशोधन, विज्ञान, नवकल्पना आणि अंतराळाशी संबंधित लोकप्रिय संस्कृती यांना एकाच व्यासपीठावर आणणारा हा भारतातील पहिल्या मोठ्या स्तरावरील महोत्सवांपैकी एक ठरणार आहे. ज्ञान आणि मनोरंजनाची सांगड घालत विद्यार्थ्यांपासून तरुणांपर्यंत नव्या पिढीमध्ये अंतराळ क्षेत्राबाबत उत्सुकता निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. या वेळी उद्योग, गुंतवणूक व सेवा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत, विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबालगन, एमआयडीसी मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, प्रायमस पार्टनर्स इंडियाच्या सहसंस्थापक व व्यवस्थापकीय संचालक आरती हरभजनका तसेच नोडविन गेमिंगचे सहसंस्थापक व व्यवस्थापकीय संचालक अक्षत राठी उपस्थित होते.

माझ्यासाठी अंतराळ म्हटले की चांद्रयान मोहिमा, इस्रो आणि नासाच्या कामगिरीची आठवण होत असे. मात्र, ‘स्पेसफेस्ट’मुळे भारतातील विद्यार्थी आणि तरुणांमध्ये या क्षेत्राबाबत किती मोठी उत्सुकता आणि क्षमता आहे, हे जाणवले. महाराष्ट्र या उपक्रमात पुढाकार घेत आहे, याचा अभिमान आहे, असे डॉ. उदय सामंत यांनी सांगितले. महाराष्ट्राला केवळ भारतातील अंतराळ क्षेत्रातील आघाडीचे राज्य नव्हे, तर जगातील महत्त्वाचे अंतराळ केंद्र बनविणे, हे सरकारचे उद्दिष्ट आहे, असेही सामंत यांनी सांगितले.

...तर रोजगाराच्या संधी वाढतील
‘स्पेसफेस्ट’चे आयोजन फेब्रुवारीमध्ये करण्यात यावे, असा प्रस्तावही सामंत यांनी मांडला. त्यामुळे रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करण्यासाठी तसेच महाराष्ट्रात अंतराळ क्षेत्राचे भक्कम वातावरण तयार करण्यासाठी आवश्यक तयारी करण्यास पुरेसा वेळ मिळेल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJPचे संस्थापक काही संत नाहीत...; अभिजीत दिपके-सौरभ दासांबद्दल सोनम वांगचुकांचा मोठा दावा, काय म्हणाले?

Sangola Politics: सांगोला राजकारणात ‘बापू-आबा’च्या कानगोष्टींनी खळबळ; नव्या राजकीय समीकरणाची चर्चा जोरात

MSEB Short Circuit: महावितरणच्या डीपीतील शॉर्टसर्किटने १२ एकर ऊस भस्मसात; २५ लाखांचे नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात

Pune Crime: प्रेमप्रकरणातील वादातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या; प्रियकर अटकेत, खराडी पोलिसांत गुन्हा दाखल

North Cyprus Boat Accident : समुद्रात प्रवासी बोट उलटली; २७० जण बुडाल्याची भीती, दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT