सराईत गुन्हेगाराला अटक
दुचाकीसह मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची उकल
अंधेरी, ता. ३० (बातमीदार) : चोरीच्या दुचाकीवरून मोबाईल चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला आंबोली पोलिसांनी शुक्रवारी (ता. ३०) अटक केली. अर्जुन ऊर्फ राजू सहानी ऊर्फ अर्जा (वय २६) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून पोलिसांनी चोरीच्या तीन दुचाकी आणि ११ मोबाईल असा तीन लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अंधेरीतील न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.
शैलेश जयराम यादव हा तरुण डिलिव्हरी बॉय असून, तो १९ ऑगस्टला तो डिलिव्हरीसाठी अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स, सुंदरवन, हिरधाम इमारतीसमोर गेला होता. इमारतीमधून परतल्यानंतर त्याला त्याची दुचाकी चोरीला गेल्याचे आढळले. त्याने याप्रकरणी आंबोली पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. त्यानंतर माहितीच्या आधारे पोलिसांनी अर्जुन सहानीला ताब्यात घेतले. तपासात अर्जुन हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध वर्सोवा पोलिस ठाण्यात सहा, आंबोली पोलिस ठाण्यात तीन, बांगूरनगर पोलिस ठाण्यात दोन, अंधेरी रेल्वे, सांताक्रूझ, कुरार, वांद्रे रेल्वे पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक अशा १६ दुचाकींसह मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.