मुंबई

चार दिवसांपूर्वी निघालो अन् होत्याचे नव्हते झाले

CD

चार दिवसांपूर्वी निघालो अन् होत्याचे नव्हते झाले
डोंबिवलीकर प्रकाश माने यांनी सांगितला थरारक अनुभव

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० : चार दिवसांपूर्वी ज्या तिमुरे मार्गाने कैलास-मानसरोवर यात्रेसाठी चीनमध्ये प्रवेश केला, त्याच ठिकाणी भीषण नैसर्गिक आपत्ती आल्याचे समजताच ४३ भारतीय यात्रेकरूंच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, त्यासह प्रवास केलेला रस्ता, पूल, वाहने, घरदार उद्ध्वस्त झाल्याचे समजले. नेपाळमध्ये परतण्याचा मार्ग बंद, चीनकडून प्रवासावर निर्बंध आणि पुढे काय, असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. अखेर कोदारी बॉर्डरमार्गे नेपाळमध्ये प्रवेश मिळाल्यानंतरच यात्रेकरूंच्या परतीचा मार्ग मोकळा झाला... कैलास-मानसरोवर यात्रेला गेलेल्या डोंबिवलीतील प्रकाश माने यांनी या थरारक अनुभव सांगितला.
प्रकाश माने हे पत्नी प्रतीक्षासह अन्य यात्रेकरूंसोबत ‘रुद्र टूर अँड ट्रॅव्हल’च्या माध्यमातून कैलास-मानसरोवर यात्रेला गेले होते. मुंबईहून काठमांडू आणि तेथून बसने तिमुरेपर्यंतचा प्रवास करून २२ ऑगस्ट रोजी त्यांनी चीनमध्ये प्रवेश केला. कैलास-मानसरोवरचे दर्शन आणि परिक्रमा पूर्ण केल्यानंतर ते २६ ऑगस्टला सागा येथे पोहोचले. तोपर्यंत तिमुरे येथे नेमके किती मोठे संकट ओढवले आहे, त्याची कल्पना नव्हती. केवळ मोठी नैसर्गिक आपत्ती झाल्याची माहिती मिळाली होती.
तिमुरे येथे २२ ऑगस्टला आम्ही २० ते २२ तास थांबलो होतो. ज्या हॉटेलमध्ये आम्ही चहा-नाश्ता केला, जेवण केले, ज्या लोकांनी आमचे आदरातिथ्य केले, त्यापैकी सर्वजण या आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडल्याचे समजल्यानंतर मन सुन्न झाले. तिमुरे येथील इमारती, वाहने, रस्ते, नेपाळ-चीन सीमेवरील मजबूत पूलदेखील वाहून गेले. कैलास-मानसरोवरच्या दर्शनासाठी आतुरतेने निघालेले आमच्यासारखे शेकडो भाविकांचा या आपत्तीत मृत्यू झाल्याचे माने यांनी सांगितले.
आपत्तीमुळे नेपाळमध्ये परतण्याचा मार्ग बंद झाला होता. चीन सरकारच्या निर्बंधांमुळे पुढील प्रवासही अनिश्चित होता. त्यामुळे आम्हा यात्रेकरूंसमोर भारतात परतण्याचे मोठे आव्हान होते. अखेर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून संबंधित यंत्रणांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने आणि तहसीलदार विकास गारुडकर यांनीही संपर्क साधून यात्रेकरूंच्या परिस्थितीची माहिती घेतली आणि आमच्या परतण्याचा मार्ग खुला झाला.
---
कोदारीमार्गे अखेर सुटका
अखेर २९ ऑगस्टला कोदारी बॉर्डरमार्गे यात्रेकरूंना नेपाळमध्ये प्रवेश मिळाला. तेथून काठमांडू गाठल्यानंतर ३० ऑगस्टला नेपाळ एअरलाइन्सच्या विमानाने मुंबईकडे प्रयाण केले. आध्यात्मिक समाधानासाठी केलेला कैलास-मानसरोवरचा प्रवास तिमुरेच्या आपत्तीमुळे आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव ठरल्याचे माने यांनी सांगितले.
----
फोटो
MUM26-F50958
--
MUM26-F50961

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

Nepal Flood Viral Video : नेपाळमधील महापुरात देवदूत बनून आली म्हैस, तरुणाचा वाचवला जीव; हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून नेटकरीही भावूक

Ranjangaon Drunk Driving: रांजणगाव-सोनेसांगवी रस्त्यावर मद्यधुंद पिकअप चालकाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Marathi News Live Updates : कॉक्रोच जनता पार्टीचा ५ सप्टेंबरला दिल्लीत मोर्चा

CJPचे संस्थापक काही संत नाहीत...; अभिजीत दिपके-सौरभ दासांबद्दल सोनम वांगचुकांचा मोठा दावा, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT