मुंबई

कूपर रुग्णालयाचे ८० हजार नेत्रदान संकल्पाचे लक्ष्य

CD

कूपर रुग्णालयाचे ८० हजार नेत्रदान संकल्पाचे लक्ष्य
नेत्रदान पंधरवड्यात जनजागृतीवर भर; वैद्यकीय प्रमाणपत्रात नोंदी करण्याचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत कूपर रुग्णालयाच्‍या वतीने ८० हजार नेत्रदान संकल्पाचे उद्दिष्ट ठेवून जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. मृत्यूनंतर नेत्रदानाच्या माध्यमातून गरजू व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा संदेश या मोहिमेतून दिला जाणार आहे. एचबीटी वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. आर. एन. कूपर महापालिका रुग्णालयात आयोजित वैद्यकीय शिक्षण कार्यक्रमात या उपक्रमाची घोषणा करण्यात आली.
कूपर रुग्णालयातील कमला सुंदरम नेत्र केंद्राच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कमला सुंदरम फाउंडेशन आणि सुंदरम नटराजन ब्लाइंड फ्री इंडिया फाउंडेशन यांच्या पुढाकाराने, महाराष्ट्र नेत्ररोगतज्ज्ञ संस्था आणि यंग ऑप्थॅल्मोलॉजिस्ट्स सोसायटी ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला. यामध्ये सुमारे ८० ते ९० नेत्रतज्ज्ञ तसेच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते.
सध्या सुरू असलेल्या नेत्रदान पंधरवड्यात रुग्णालयाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. मृत्यूनंतर दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय कारण प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत नेत्रदानासंदर्भातील नोंदी प्रभावीपणे करण्यावरही भर दिला जाणार आहे. रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या नातेवाइकांशी संवाद साधून नेत्रदानासाठी त्यांचे समुपदेशन करण्याची व्यवस्था अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मृत्यूनंतर नेत्रदानासाठी कुटुंबीयांचे समुपदेशन
नेत्रदानाबाबत समाजात अजूनही मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज असल्याचे कूपर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे यांनी सांगितले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत ८० हजार नागरिकांकडून नेत्रदान करून घेण्याचे उद्दिष्ट आहे.

मधुमेहामुळे डोळ्यांवर होणाऱ्या परिणामांवर चर्चा
परिषदेत मधुमेहामुळे डोळ्यांच्या पडद्यावर होणारा परिणाम म्हणजेच मधुमेही नेत्रपटल विकार यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या आजाराचे वेळीच निदान, प्रतिबंध आणि उपचारातील आधुनिक पद्धती यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. लेसर उपचार, डोळ्यात औषध देण्याची पद्धत, मधुमेहामुळे डोळ्याच्या मध्यभागी निर्माण होणारी सूज, शस्त्रक्रिया, ओसीटी तपासणीतील नवे निष्कर्ष आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांनी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : केंद्रिय मंत्रीमंडळात फेरबदल? महाराष्ट्रातील 'या' नेत्यांचा पत्ता कट होणार?, संभाव्य नावे समोर

India T20I Squad: संजू सॅमसनचं कमबॅक! अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर;बुमराह खेळणार की नाही?

Kalamb News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपळगाव डोळा येथे रास्ता रोको; तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

Shirur News : पूजा गई यांचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यु झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी; पती राहुल देवीदास गई यांची मागणी

Marathi News Live Updates : सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल, मनोज जरांगेंची घेणार भेट

SCROLL FOR NEXT