मुंबई

तपासण्या वाढल्या; तरी स्तन कर्करोगाचे आव्हान कायम

CD

तपासण्या वाढल्या तरी स्तन कर्करोगाचे आव्हान कायम
कामा रुग्णालयात तीन वर्षांत रुग्णसंख्या ६८ टक्क्यांनी वाढली

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : स्तन कर्करोगाबाबत तपासणीचे महत्त्व महिलांपर्यंत पोहोचत असले, तरी आजाराचे वाढते प्रमाण हे केवळ निदानाच्या प्रश्नापुरते मर्यादित नसल्याचे मुंबईतील रुग्णालयातील आकडेवारीतून दिसून येत आहे.
कामा आणि आल्ब्लेस रुग्णालयात स्तन कर्करोगाच्या रुग्णांची संख्या २०२३ मधील ८२८ वरून २०२५ मध्ये १,३९३ पर्यंत पोहोचली. तीन वर्षांत झालेली ही सुमारे ६८ टक्क्यांची वाढ आहे. २०२६च्या जानेवारी ते जुलै या सात महिन्यांतच ७१३ रुग्णांची नोंद झाली आहे.
तपासणीचे प्रमाण वाढल्याने पूर्वी निदान न झालेली काही प्रकरणे आता उपचार व्यवस्थेपर्यंत पोहोचत असण्याची शक्यता आहे; मात्र रुग्णसंख्येतील वाढीच्या पार्श्वभूमीवर स्तन कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी केवळ नियमित तपासणीवर भर देणे पुरेसे ठरत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. महिलांनी आजाराची जोखीम वाढविणारे घटक समजून घेणे आणि त्यातील बदलता येणाऱ्या घटकांवर काम करणेही तितकेच महत्त्वाचे ठरत आहे.
बदलती जीवनशैली, वाढते वजन, उशिरा होणारी प्रसूती यांसह विविध घटक स्तन कर्करोगाच्या जोखमीशी संबंधित आहेत. त्यामुळे ‘३५ वर्षांनंतर तपासणी’ या संदेशाबरोबरच जोखीम कमी करण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करता येतील, कोणाला अधिक जोखीम आहे आणि कोणत्या वेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा, याबाबतची माहिती महिलांपर्यंत पोहोचविण्याची गरज वाढली आहे.

जीवनशैलीकडेही लक्ष देण्याची गरज
स्तन कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी वजन नियंत्रण, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि स्तनपान यांसारख्या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे कामा आणि आल्ब्लेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले. कुटुंबातील आजाराचा इतिहास किंवा इतर वैयक्तिक जोखीम असल्यास त्यानुसार वैद्यकीय सल्ला घेणेही महत्त्वाचे आहे.

तपासणीमुळे अधिक महिलांमध्ये आजाराचे निदान होत आहे, ही सकारात्मक बाब आहे; मात्र तपासणी करून थांबणे पुरेसे नाही. वजन नियंत्रणात ठेवणे, नियमित शारीरिक हालचाल, योग्य आहार, स्तनपान आणि स्वतःची वैयक्तिक जोखीम समजून घेणे याकडेही लक्ष दिले पाहिजे. स्तन कर्करोगाचा धोका कोणत्या कारणांमुळे वाढतो आणि त्यातील कोणते घटक आपल्या नियंत्रणात आहेत, याबाबत अजूनही पुरेशी जागरूकता नाही.
- डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा आणि आल्ब्लेस रुग्णालय

भारतातील प्रमाणही वाढले
भारतात स्तन कर्करोगाचे वाढते ओझेही या समस्येची तीव्रता अधोरेखित करते. ‘द लॅन्सेट ऑन्कोलॉजी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेसच्या विश्लेषणानुसार, भारतातील स्तन कर्करोगाचे प्रमाण १९९० मध्ये प्रति एक लाख लोकसंख्येमागे १३ होते. २०२३ मध्ये ते २९.४ पर्यंत वाढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८ अब्ज लोकांना लॅपटॉप देता येईल इतका काळा पैसा; CJI सूर्यकांत यांचं मनी लॉन्ड्रिंगवर भाष्य

Vaibhav Sooryavanshi ची विकेट पडताच संघ कोसळला; अवघ्या १०५ धावांत १० फलंदाज OUT, सामना २६६-२६६ असा बरोबरीत, पुढे काय?

स्टार प्रवाहवर नागीण बनली आणि माझं स्वप्न पूर्ण झालं! असं का म्हणाली 'मी कात टाकली'ची अभिनेत्री?

Zomato Rules: झोमॅटोवर बनावट पनीरला नो एंट्री! Analog Dairy पदार्थांवर बंदी; रेस्टॉरंट्ससाठी कडक नियम जारी

Prakash Ambedkar on Jarange: जरांगे यांच्या आंदोलनाचे केंद्र मुंबईऐवजी दिल्लीकडे - ॲड. प्रकाश आंबेडकरांचा दावा

SCROLL FOR NEXT