मंगळागौर स्पर्धेतून संस्कृतीचा सोहळा ः महापौर सुजाता पाटील
विष्णुदास भावे नाट्यगृहात पालिका महिला मेळावा, मंगळागौर स्पर्धा
नेरूळ, ता. ३१ (बातमीदार) : मंगळागौर स्पर्धा हे महिलांना एकत्र आणण्याचे एक उत्तम माध्यम आहे. मंगळागौर हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सोहळा असून, याद्वारे खऱ्या अर्थाने नारीशक्तीचा जागर होतो. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला आपल्या संस्कृतीचे जतन करणाऱ्या दूत आहेत, असे उद्गार महापौर सुजाता पाटील यांनी काढले. महिला व बालकल्याण समितीच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित महिला मेळाव्यानिमित्त त्या बोलत होत्या.
महिला मेळाव्यानिमित्त आयोजित केलेल्या मंगळागौर स्पर्धेत रुचिरा ग्रुप, ऐरोली यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच नारीशक्ती मंगळागौर समूह, नेरूळ यांनी द्वितीय आणि वाशीचा राजा महिला बचत गट यांनी तृतीय क्रमांक पटकावला. नृत्य कलावंत अशिमिक कामठे आणि आरती पानसरे यांनी मंगळागौर स्पर्धेचे परीक्षण केले. त्यांनी सादर केलेल्या नृत्यालाही रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. या स्पर्धेत ३२ महिला समूहांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी ६५ महिला बचत गट व महिला मंडळे यांनी उत्पादित केलेल्या साहित्याचे स्टॉल्स लावण्यात आले होते.
याप्रसंगी महापौर सुजाता पाटील यांच्यासमवेत आमदार मंदा म्हात्रे, सभागृह नेते सागर नाईक, महिला व बालकल्याण समिती सभापती सलुजा सुतार, फ प्रभाग समिती सभापती ललिता मढवी, आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक जयवंत सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. मंदा म्हात्रे यांनी मंगळागौर स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे जतन होते, असे सांगत सर्वांच्या एकत्र येण्याने हा कार्यक्रम आनंदोत्सव झाला, असे मत व्यक्त केले. महिलांसाठी पालिका करीत असलेल्या योजनांची लवकरात लवकर प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले.
एनएमएमटीत लवकरच महिला चालक
एनएमएमटी बसेसमध्ये चालकही आता महिलाच असतील, असे महापौरांनी सांगितले. त्यादृष्टीने महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणारी योजना महासभेत मंजूर केली असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील एकल महिलांसाठीच्या योजनांकरिताही नोंदणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.