मुंबई

विद्या भवन शाळेत क्रीडा दिन उत्साहात साजरा

CD

विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे ः क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव
विद्या भवन शाळेत क्रीडा दिन उत्साहात
नेरूळ, ता. ३१ (बातमीदार) ः खेळामध्ये शिस्तीला कोणताही पर्याय नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या डिजिटल युगात मोबाईलच्या अतिवापराची मोठी चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर मर्यादित करून जास्तीत जास्त मैदानी खेळांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेचे क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांनी केले.
पुणे विद्यार्थी गृहाच्या विद्या भवन शाळा, नेरूळ कुलसचिव दिनेश मिसाळ त्यांच्या प्रेरणेने राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. या वेळी गुरव हे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. मुख्याध्यापिका श्रीजा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन रेवप्पा गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनातील समर्पण, अथक परिश्रम, शिस्त आणि राष्ट्रप्रेम हे गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत, असे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासामध्ये क्रीडेचे महत्त्व प्रभावीपणे विशद केले. क्रीडा शिक्षक विनायक मनसुख यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्याची व क्रीडा क्षेत्रातील योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी क्रीडा विषयावर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. प्रश्नमंजूषा स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास मुख्याध्यापक गोरख कदम, क्रीडा शिक्षक विनायक मनसुख, जयवंत अगीवले, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक विनायक मनसुख यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : पंतप्रधान मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या भेटीदरम्यान आम्ही खलाशांचा मुद्दा उपस्थित केला

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT