उल्हासनगर, ता. ३१ (बातमीदार) : पूर्ववैमनस्यातून तरुणाचे डोके आणि तोंडावर दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या हल्ल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत राजन गुप्ता याला काही तासांतच अटक केली. हल्ल्यात रोशन सुरडकर गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल केले आहे.
कॅम्प क्रमांक ४, सेक्शन २५ येथील मरियम व्ह्यू अपार्टमेंटजवळ ही घटना घडली. पूर्ववैमनस्यातून गुप्ता याने सुरडकर यांच्यावर दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात रोशन यांच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना केईएम रुग्णालयात पाठवले. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी तपास सुरू केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रशांत खरात, रामदास मिसाळ, दिलीप चव्हाण, चंदू गायकवाड, संतोष सांगळे आणि सागर मोरे यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी गुप्ताला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी रोशन यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे तक्रारीत नमूद असले, तरी त्यामागील नेमके कारण रोशन यांच्या जबाबानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती गोडसे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.