मुंबई

भाज्यांचे दर कडाडले

CD

मुरबाड, ता. १ (वार्ताहर) : श्रावण महिन्यात भाजीपाल्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यातच पावसामुळे मुरबाड तालुक्यात काही ठिकाणी भाजीपाल्याचे नुकसान, आवक घटणे आणि वाहतूक खर्च यामुळे कांदा-बटाट्यासह विविध भाज्यांच्या दर कडाडले आहेत. यामुळे गृहिणीचे बजेट कोलमडले आहे.
श्रावणातील उपवास आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे बटाटा, रताळे, काकडी, भोपळा, दुधी भोपळा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आदी भाज्यांना मागणी वाढली आहे. ग्रामीण बाजारपेठांमध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या भाज्यांचे दरही वाढले आहेत. वांगी, भेंडी, गवार, दोडका, कारले, शेवगा, घेवडा, तोंडली आदी भाज्यांच्या दरात गेल्या काही दिवसांच्या तुलनेत वाढ झाली आहे, असे शिवळे/कलमखांडे येथील भाजीपाला विक्रेता प्रवीण कापडी यांनी सांगितले.
दरवाढीचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराला बसत आहे. वाढत्या महागाईमुळे आधीच घरखर्चाचे गणित बिघडलेले असताना भाजीपाल्याचे दर वाढल्याने गृहिणींची चिंता वाढली आहे.  गणेशोत्सवाच्या काळात मागणी आणखी वाढल्यास दर वाढण्याची शक्यता आहे. यासाठी बाजार समित्या व संबंधित प्रशासनाने दरांवर लक्ष ठेवावे; तसेच साठेबाजी होत नाही ना, याची तपासणी करावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

भाजीपाल्याचे किरकोळ दर
भाजीपाला    दर (रुपये प्रति किलो)
कांदा   ४५ ते ६०
बटाटा  २०
फ्लॉवर  ८०
मटार  १२०
लसूण  २४०
कोबी  ४०
वांगी ५०
शिमला मिरची ८०
कारले ८०
घेवडा ८०
गवार १००
तोंडली ८०
भेंडी  ६०
शिरोळा  ८०
घोसाळी  ५०
लवंगी मिरची  ८०
जाडी मिरची  ८०
गाजर  ६०
बीट  ६०
काकडी ४०
शेवगा ८०
लिंबू १५०
टोमॅटो ४०
अद्रक १००

मुरबाड : तालुक्यातील ग्रामीण भागात भाज्यांचे दर महागले आहेत.
MUM26F51007

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईटवर बंदी; पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय

Astrology: पुढच्या 48 तासांत बदलतीये ग्रह दशा! चमकणार 'या' राशींचे नशीब; धनलाभासह मिळतील मोठ्या आनंदाच्या बातम्या

Gas Cylinder : घरगुती वापराचा सिलिंडर, खाऊगल्लीत ‘सरेंडर’; शहरातील वाढत्या प्रकारांकडे भरारी पथकांचा काणाडोळा

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, मराठा आंदोलकांकडून शोले स्टाईल आंदोलन

Manoj Jarange Patil : उपाशीपोटी कोणी राहू नये म्हणून... आंतरवालीत 3 क्विंटल दाळबाटी!

SCROLL FOR NEXT