मुंबई

जिल्हा परिषद शाळांचा कायापालट होणार

CD

मुरबाड, ता. १ (वार्ताहर) : मुरबाड विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी आमदार किसन कथोरे यांनी कुणबी समाज भवन येथे शिक्षण विभागाची तातडीची आढावा बैठक घेतली. या वेळी २९ केंद्रप्रमुखांकडून शाळानिहाय माहिती घेऊन आवश्यक सुविधांसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश कथोरे यांनी दिले.
बैठकीत शाळांमधील वर्गखोल्यांची संख्या, नवीन वर्गखोल्यांची आवश्यकता, धोकादायक व निर्लेखित इमारती, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याचे पाणी, हात धुण्याची व्यवस्था, वीज, क्रीडांगण, संरक्षक भिंत, शिक्षकांची संख्या व रिक्त पदे, स्वयंपाकगृहाची दुरुस्ती तसेच शाळांपर्यंत पोहोचणाऱ्या रस्त्यांची स्थिती याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद शाळांचे रूपडे पालटून त्यांना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देतानाच शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन कथोरे यांनी केले. बैठकीला गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘मुरबाड शिक्षण पद्धती’ची संकल्पना
मुरबाडमधील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू शकेल, अशी शिक्षण पद्धती विकसित करायची आहे. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत घेण्यात यावी; मात्र शैक्षणिक दर्जा वाढविल्याशिवाय पर्याय नाही, असे आमदार कथोरे यांनी सांगितले. नवीन अध्यापन पद्धतींचा वापर करून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. कामचुकारपणा करणाऱ्या तसेच नियमित उपस्थित न राहणाऱ्या शिक्षकांनाही त्यांनी खडे बोल सुनावले. आगामी शिक्षक भरतीमुळे शिक्षकांची कमतरता दूर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election Satej Patil : गोकुळमध्ये कोरमचा पेच सुटणार? गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी २५ संचालक एकत्र येतील; सतेज पाटलांना विश्वास

अमिताभ बच्चन, दिलजीत दोसांझ यांना बॉम्बहल्ल्याची धमकी; दादरमधील चार शाळांनाही ईमेल, तपास सुरू

PM Kisan 24th Installment : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा, 'या' दिवशी खात्यात येणार २००० रुपये; 'पीएम किसान' च्या हप्त्याची तारीख जाहीर

Marathi News Live Updates: जिओ IPO चा ऐतिहासिक विक्रम! 1 कोटी अर्जांचा टप्पा पार करत मोडले सर्व रेकॉर्ड

Cybercrime: दिल्ली पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; पाच बँक कर्मचाऱ्यांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT