नारळफोडी स्पर्धा संस्कृती जोडणारा दुवा
शेकापच्या चित्रलेखा पाटील यांचे मत
अलिबाग, ता. ३१ (वार्ताहर) : डिजिटल युगात आधुनिक मनोरंजनाच्या साधनांमुळे पारंपरिक खेळ मागे पडण्याची शक्यता असताना नारळी पौर्णिमेच्या माध्यमातून हे खेळ आजही जिवंत ठेवले जात आहेत. नारळफोडी स्पर्धा केवळ करमणुकीचे साधन नसून, नव्या पिढीला लोकपरंपरा, संस्कृती आणि सामुदायिक जीवनाशी जोडणारा दुवा ठरत आहे, असे मत शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र प्रतोद चित्रलेखा पाटील यांनी मांडले.
तालुक्यातील नागाव कोठारभाटमध्ये ॲड. हर्षल मोरे यांच्या प्रयत्नातून साईभक्त मित्रमंडळाच्या वतीने आयोजित पारंपरिक नारळफोडी स्पर्धचे उद्घाटन चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी मंडळाचे प्रमुख ॲड. हर्षल मोरे, माजी सरपंच निखिल मयेकर, डॉ. संतोष मोरे, ग्रामपंचायत सदस्य प्रियांका काठे आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेत जिंकण्यासाठी स्पर्धकांमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली होती. त्यात प्रथम क्रमांक चिमण्याप्रेमी या संघाने पटकावला, तर समर्थ कोपर (बी) द्वितीय, नवतरुण करावी तृतीय, आरजे सुयोग संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला.
सर्व विजयी स्पर्धकांना ॲड. हर्षल मोरे यांच्या हस्ते रोख रक्कम व चषक देण्यात आला. पाच ते आठ क्रमांकांना भेटवस्तू बक्षीस म्हणून देण्यात आल्या. त्यात अनुक्रमे पूर्वीत राणे, समर्थ कोपर, क्रिश खोपटकर, सान्वी उदय राऊळ यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.