मुंबई

अतिरिक्त आयुक्तपद पुन्हा रिक्त

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : महापालिकेच्या विविध विभागांमध्ये दीर्घकाळ सेवा बजावलेल्या ३० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज (ता. ३१) नियत वयोमानानुसार महापालिका सेवेतून निवृत्ती घेतली. यामध्ये काही दिवसांपूर्वीच अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारलेले मनीष जोशी यांचाही समावेश असल्याने महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त (१) हे महत्त्वाचे पद पुन्हा रिक्त झाले आहे.

सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आला. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पालिकेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी तसेच नागरिकांना विविध सेवासुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे योगदान दिले. त्यांचे कार्य आणि अनुभव महापालिकेच्या वाटचालीत महत्त्वाचे असल्याचे महापौरांनी नमूद केले. नोकरीच्या काळात प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावल्यानंतर आता सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य कुटुंबीयांसमवेत आनंदाने घालवावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. सोमवारी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये १२ सफाई कामगारांसह मुख्याध्यापक, शिक्षक, प्राध्यापक, माळी, बिगारी, मुकादम, सिस्टर इनचार्ज, अग्निशमन विभागातील कर्मचारी तसेच अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

दरम्यान, ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सलग निवृत्तीमुळे महत्त्वाच्या पदांवर रिक्तता निर्माण होत आहे. मागील महिन्यात अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी हे सेवेतून निवृत्त झाले होते. त्यानंतर मनीष जोशी यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली; मात्र पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांचीही सेवानिवृत्ती झाल्याने प्रशासनासमोर पुन्हा या पदावर नियुक्ती करण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८ अब्ज लोकांना लॅपटॉप देता येईल इतका काळा पैसा; CJI सूर्यकांत यांचं मनी लॉन्ड्रिंगवर भाष्य

Vaibhav Sooryavanshi ची विकेट पडताच संघ कोसळला; अवघ्या १०५ धावांत १० फलंदाज OUT, सामना २६६-२६६ असा बरोबरीत, पुढे काय?

स्टार प्रवाहवर नागीण बनली आणि माझं स्वप्न पूर्ण झालं! असं का म्हणाली 'मी कात टाकली'ची अभिनेत्री?

Zomato Rules: झोमॅटोवर बनावट पनीरला नो एंट्री! Analog Dairy पदार्थांवर बंदी; रेस्टॉरंट्ससाठी कडक नियम जारी

Prakash Ambedkar on Jarange: जरांगे यांच्या आंदोलनाचे केंद्र मुंबईऐवजी दिल्लीकडे - ॲड. प्रकाश आंबेडकरांचा दावा

SCROLL FOR NEXT