मुंबई

कोट्यवधींच्या रेसची तयारी; मग नेरुळ रेल्वे स्थानकाला ‘स्मार्ट’ कधी करणार?

CD

नेरूळ स्थानकाची दुर्दशा
आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या तयारीत प्रवेशद्वाराकडे दुर्लक्ष; स्वच्छता, पार्किंग आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
जुईनगर, ता. ३१ (बातमीदार) : नवी मुंबईत कोट्यवधी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय मोटरस्पोर्ट कार्यक्रमाची तयारी सुरू असताना शहराचे महत्त्वाचे प्रवेशद्वार असलेल्या नेरूळ रेल्वे स्थानक परिसरातील अस्वच्छता आणि अव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. गुटखा-पानाच्या पिचकाऱ्या, कचरा, सांडपाणी, दुर्गंधी, अस्ताव्यस्त पार्किंग आणि हॉकर्सच्या गर्दीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी अपुरी प्रकाशव्यवस्था आणि सुरक्षेबाबतही नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहे.
नवी मुंबईत सुमारे २८ कोटी रुपयांच्या खर्चातून मोठ्या मोटरस्पोर्ट कार्यक्रमाचे आयोजन होणार असल्याची चर्चा आहे. देश-विदेशातून प्रेक्षक, पाहुणे आणि मान्यवर शहरात येण्याची शक्यता असल्याने रेल्वेने येणाऱ्यांसाठी नेरूळ स्थानक महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र स्थानकाबाहेर पडताच अस्वच्छता आणि अव्यवस्थेचे चित्र दिसल्यास नवी मुंबईच्या आधुनिक शहराच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता आहे.
नेरूळ परिसरात क्रिकेटसह मोठ्या कार्यक्रमांच्या वेळी वाहनांची संख्या वाढल्याने पार्किंग आणि वाहतुकीचा प्रश्न गंभीर होतो. काही दिवसांची तात्पुरती व्यवस्था करण्याऐवजी कायमस्वरूपी नियोजन करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. स्थानक परिसरातील स्वच्छता, अनधिकृत फेरीवाले, सांडपाणी, सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर रेल्वे प्रशासन, महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कायमस्वरूपी व्यवस्थेची गरज
मोठा कार्यक्रम जवळ आला की स्वच्छता मोहीम, रंगरंगोटी आणि अतिरिक्त बंदोबस्त वाढविण्याची पद्धत न ठेवता स्थानक परिसरासाठी नियमित देखभाल यंत्रणा उभारण्याची गरज आहे. कचरा उचलणे, गुटखा-पानाच्या पिचकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, सांडपाण्याचा निचरा आणि स्वच्छतागृहांची नियमित देखभाल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.

पार्किंगसह सुरक्षेला प्राधान्य
वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन शिस्तबद्ध पार्किंग आराखडा तयार करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढविणे, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यक्षम ठेवणे आणि प्रकाशव्यवस्था सुधारणे गरजेचे आहे. रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा विभाग, महापालिका आणि पोलिस यांच्यात समन्वय साधून कालबद्ध कृती आराखडा तयार केल्यास नेरूळ स्थानकाचा परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि व्यवस्थित होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : दम्मम-दिल्ली एअर इंडियाच्या विमानाचे अहमदाबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT