मुंबई

फेरीवाले हटले; खरेदी महागली!

CD

फेरीवाले हटले; खरेदी महागली!
सणासुदीला तात्पुरत्या जागा देण्याची ग्राहकांसह विक्रेत्यांची मागणी
रजनीकांत साळवी : सकाळ वृत्तसेवा
प्रभादेवी, ता. ३१ : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मुंबईतील बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, रस्त्याच्या कडेला आणि पदपथांवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना बसू दिले जात नसल्याने यंदाची गणेशोत्सवाची खरेदी कशी करायची, असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात फुले, सजावटीच्या वस्तू, मखराचे साहित्य, पूजेचे साहित्य, आरास, विद्युत माळा, तोरणे, लहान मूर्ती तसेच विविध घरगुती वस्तू फेरीवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. या वस्तू बाजारातील मोठ्या दुकानांच्या तुलनेने स्वस्त दरात मिळत असल्याने मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिक फेरीवाल्यांकडून खरेदीला प्राधान्य देतात. मात्र अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना सर्वच फेरीवाल्यांना हटविले जात असल्याने ग्राहकांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. अधिकृत आणि नियोजित जागा उपलब्ध करून दिल्यास फेरीवाले आणि ग्राहक दोघांनाही दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया काही ग्राहकांनी व्यक्त केली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने फेरीवाल्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात फक्त सणापुरते नियोजित जागा उपलब्ध करून द्याव्यात आणि ग्राहकांना सुरक्षित व सोयीस्कर खरेदीची सुविधा द्यावी, अशी मागणी वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांनी केली आहे.
दादर हे समस्त मुंबईवासीयांचे हक्काचे ठिकाण आहे. शिवाय हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने मुंबईच्या कानकोपऱ्यातून अनेक जण सणासुदीच्या दिवसांत येथे खरेदीसाठी येतात. अनेकांना अशा फेरीवाल्यांकडे खरेदीसाठी बरेच पर्याय उपलब्ध असतात. शिवाय त्या वस्तू माफक दरातदेखील मिळतात.

ग्राहकांचे म्‍हणणे काय?
विशेषतः सणासुदीच्या काळात रस्त्याच्या कडेला उपलब्ध होणाऱ्या वस्तू सहज आणि कमी किमतीत मिळत असल्याने त्यावर अनेक कुटुंबांचे गणेशोत्सवाचे बजेट अवलंबून असते. फेरीवाल्यांना शिस्त लावावी, मात्र सणाच्या काळात ग्राहकांची गैरसोय होणार नाही याचीही प्रशासनाने काळजी घ्यावी, असे मत ग्राहकांनी व्‍यक्‍त केले.

सणासुदीच्या काळात अनेक ठिकाणी प्रदर्शन भरविण्यात येते. त्यात दामदुपटीने वस्तू विकल्या जातात. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना त्यांच्या खिशाला परवडेल अशी खरेदी फेरीवाल्यांकडून होत असते. मात्र त्यांना बसू दिले जात नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहवरही गदा आली आहे.
- अनुश्री माने, ग्राहक

गेल्या आठ महिन्यांपासून आमचा व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे आमच्या उदरनिर्वाहावर गदा आली आहे. आम्हाला फक्त सणासुदीला तरी प्रशासनाने बसू द्यावे, एवढीच माफक मागणी आहे.
- प्रवीण तोरस्कर, फेरीवाले

आम्हाला बसू दिले जात नसल्याने आमचे बरेच ग्राहक तुटले आहेत. ते वारंवार आम्हाला विचारणा करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने आमच्या उदरनिर्वाहाचा विचार करावा.
- प्रमोद भाटकर, फेरीवाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८ अब्ज लोकांना लॅपटॉप देता येईल इतका काळा पैसा; CJI सूर्यकांत यांचं मनी लॉन्ड्रिंगवर भाष्य

Vaibhav Sooryavanshi ची विकेट पडताच संघ कोसळला; अवघ्या १०५ धावांत १० फलंदाज OUT, सामना २६६-२६६ असा बरोबरीत, पुढे काय?

स्टार प्रवाहवर नागीण बनली आणि माझं स्वप्न पूर्ण झालं! असं का म्हणाली 'मी कात टाकली'ची अभिनेत्री?

Zomato Rules: झोमॅटोवर बनावट पनीरला नो एंट्री! Analog Dairy पदार्थांवर बंदी; रेस्टॉरंट्ससाठी कडक नियम जारी

Prakash Ambedkar on Jarange: जरांगे यांच्या आंदोलनाचे केंद्र मुंबईऐवजी दिल्लीकडे - ॲड. प्रकाश आंबेडकरांचा दावा

SCROLL FOR NEXT