मुंबई

मॅरेथॉनच्या ढिसाळ नियोजनाची चौकशी करा

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ ः ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या आयोजनातील ढिसाळ नियोजन आणि गैरव्यवस्थापनाची महापालिकेबाहेरील त्रयस्थ समितीमार्फत थेट चौकशी करावी, तसेच स्पर्धकांकडून आकारण्यात आलेले शुल्क बेकायदा असल्यास ते त्वरित परत करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.

रविवारी (ता. ३०) झालेल्या मॅरेथॉनमध्ये स्पर्धा उशिरा सुरू होणे, पदकवाटपातील गोंधळ, ई-प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी आणि नाष्ट्याची उशिरा झालेली व्यवस्था यामुळे स्पर्धकांना गैरसोयीला सामोरे जावे लागल्याचा दावा मुल्ला यांनी केला आहे. या सर्व प्रकाराची जबाबदारी निश्चित करण्यासाठी स्वतंत्र चौकशी आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या खेळाडू आणि नागरिकांकडून शुल्क आकारण्यात आल्याचा दावा करत, हे शुल्क कोणत्या निर्णयाच्या अथवा मंजुरीच्या आधारे आकारण्यात आले, असा सवाल मुल्ला यांनी केला आहे. महासभा किंवा संबंधित बैठकीत शुल्क आकारणीला मंजुरी देण्यात आली नसल्यास हे शुल्क बेकायदा ठरते. त्यामुळे आकारलेले शुल्क तातडीने संबंधित स्पर्धकांना परत करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. महापालिकेने आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी यापूर्वी स्पर्धकांकडून शुल्क आकारले जात नव्हते. मग यंदा शुल्क आकारण्याचा निर्णय नेमका कुणी घेतला आणि कोणत्या अधिकारात घेतला, असा थेट प्रश्न मुल्ला यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८ अब्ज लोकांना लॅपटॉप देता येईल इतका काळा पैसा; CJI सूर्यकांत यांचं मनी लॉन्ड्रिंगवर भाष्य

Vaibhav Sooryavanshi ची विकेट पडताच संघ कोसळला; अवघ्या १०५ धावांत १० फलंदाज OUT, सामना २६६-२६६ असा बरोबरीत, पुढे काय?

स्टार प्रवाहवर नागीण बनली आणि माझं स्वप्न पूर्ण झालं! असं का म्हणाली 'मी कात टाकली'ची अभिनेत्री?

Zomato Rules: झोमॅटोवर बनावट पनीरला नो एंट्री! Analog Dairy पदार्थांवर बंदी; रेस्टॉरंट्ससाठी कडक नियम जारी

Prakash Ambedkar on Jarange: जरांगे यांच्या आंदोलनाचे केंद्र मुंबईऐवजी दिल्लीकडे - ॲड. प्रकाश आंबेडकरांचा दावा

SCROLL FOR NEXT