मुंबई

नवी मुंबईत मेट्रोचे जाळे

CD

मेट्रो धावणार ‘नैना’पर्यंत
पनवेल जोडण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३१ ः नवी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या बेलापूर ते पेंधर या पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवेच्या अभूतपूर्व यशानंतर, आता मेट्रोचा पुढील टप्प्यात वेगाने विस्तार करण्याची तयारी सुरू झाली आहे. पेंधर येथून ही मेट्रो मार्गिका पुढे तळोजा एमआयडीसी, कळंबोली, खांदेश्वर, पनवेल आणि सिडकोच्या महत्त्वाकांक्षी ‘नैना’ क्षेत्रापर्यंत जोडली जाणार आहे. या विस्तारामुळे नवी मुंबईच्या उपनगरीय व ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे. हे काम एमएमआरसीएल करणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
बेलापूर ते पेंधर (टप्पा १) मार्गिका यशस्वीरीत्या सुरू झाल्यानंतर सिडको आणि राज्य शासनाने पुढील विस्ताराच्या आराखड्याला व निधीला गती दिली आहे. पेंधर येथून ही मार्गिका तळोजा एमआयडीसी, कळंबोली आणि खांदेश्वर रेल्वे स्थानकापर्यंत वाढवली जाईल. पुढे खांदेश्वर येथून मेट्रो मार्ग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडला जाईल, तर दुसरी शाखा पनवेल आणि नैना क्षेत्रातील वेगाने विकसित होणाऱ्या गावांपर्यंत विस्तारित केली जाईल. नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन गृहप्रकल्प आणि व्यापारी संकुले उभी राहत आहेत; मात्र या भागात मजबूत सार्वजनिक वाहतूक यंत्रणेची गरज होती. पेंधर-पनवेलमार्गे मेट्रो नैना क्षेत्रात पोहोचल्याने या परिसरातील नागरिकांना थेट बेलापूर, वाशी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत थेट व पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. राज्य शासन आणि सिडकोने या टप्प्यासाठी आवश्यक मंजुरी व निधी नियोजनाचे काम वेगाने सुरू केले आहे. या विस्तारित मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण नवी मुंबई आणि पनवेल परिसर एकाच मेट्रो जाळ्याने जोडला जाणार आहे.

वाहतूक कोंडीतून मुक्ती
सायन-पनवेल महामार्ग आणि तळोजा-एमआयडीसी रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. खारघर, तळोजा आणि पनवेल भागातील नागरिकांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी थेट मेट्रोची सुविधा मिळेल. मेट्रो विस्तारामुळे तळोजा, पनवेल आणि नैना परिसरातील गृहनिर्माण क्षेत्राला मागणी वाढून स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल. खांदेश्वर आणि पनवेल स्थानकांशी मेट्रो जोडल्यामुळे हार्बर व मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा ताण विभागला जाईल.

या भागाला होणारा प्रत्यक्ष फायदा
तळोजा एमआयडीसी व पेंधर या भागात मेट्रोचे जाळे निर्माण झाल्यामुळे उद्योजक, कामगार आणि स्थानिक रहिवाशांना थेट खांदेश्वर व बेलापूर स्थानकांशी वेगवान जोडणी मिळणार आहे. कामोठे, कळंबोली व खांदेश्वर, सायन-पनवेल महामार्गावरील रोजची वाहतूक कोंडी टाळून रहिवाशांना सुरक्षित आणि एसी मेट्रो प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी खांदेश्वर स्थानकावरून थेट मेट्रोची कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. नैना क्षेत्रातील चिखले, कोन, पनवेल ग्रामीण वेगाने विकसित होणाऱ्या नवीन गृहप्रकल्पांना थेट नवी मुंबई आणि मुंबई शहराशी जोडता येणार आहे.

प्रकल्पाचा अंदाजित खर्च
पेंधर-तळोजा एमआयडीसी ते खांदेश्वर या सुमारे ८.१५ किमी ते १०.३ किमीच्या मार्गिका दोनसाठी पाच हजार ५७५ कोटी इतक्या सुधारित खर्चाच्या निधीला राज्य सरकारने याआधीच मंजुरी देण्यात आली आहे. तर पेंधर ते तळोजा इंटरलिंक टप्पा तीन यात पेंधर स्थानक ते तळोजा एमआयडीसी जोडणाऱ्या २.२ किमीच्या टप्प्यासाठी सुमारे ५७४ कोटी खर्च अपेक्षित आहे.

नैनाला मेट्रोची जोड
नैना क्षेत्रासाठी विशेष निधी उपलब्ध केला आहे. सिडकोने नैना क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि मेट्रोच्या नवीन विस्तारासाठी कळंबोली-चिखले-कोन कॉरिडॉरकरिता आपल्या वार्षिक अर्थसंकल्पातून ६९० कोटींपेक्षा जास्त निधीची स्वतंत्र तरतूद केली आहे. तर राज्य सरकारने मंजुरी देत तळोजा ते खांदेश्वर या मार्गिका क्रमांक दोन या ८.१५ किलो मीटरच्या कॉरिडॉरला आणि पाच हजार ५७५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. नैना क्षेत्र आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणाऱ्या नवीन मार्गांसाठी सिडकोने सर्वसमावेशक वाहतूक आराखडा तयार केला असून तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती प्रक्रियेत आहे. पहिल्या टप्प्यातील १.१ किमी मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर, आता मार्गिका दोन आणि तीनच्या प्रत्यक्ष सिव्हिल कामांसाठीच्या निविदा व जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेला गती दिली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुढील ३ दिवस महत्त्वाचे! राज्यात पावसाचा जोर वाढणार, विजांच्या कडकडाटासह मुसळधारेचा अंदाज; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Inspirational Story: अनवाणी पायाने धावली आई! बीडमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी जिंकली मॅरेथॉन...

Jotiba Dongar News : ऊन सावली अन् विक्रमी गर्दीत रंगली जोतिबाची नगर प्रदक्षिणा...

Marathi News Live Updates : BPSC TRE 4 मधील ३२,३८८ रिक्त पदांसाठीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे ढकलली

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

SCROLL FOR NEXT