मुंबई

‘क्षय केंद्रे’ आजपासून बंद

CD

‘क्षय केंद्रे’ आजपासून बंद
१२ वर्षांची सेवा संपुष्टात; तज्ज्ञ निर्णयावर नाराज

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या (डीआर-टीबी) रुग्णांसाठी गेल्या १२ वर्षांपासून सुरू असलेली स्वयंसेवी संस्थांची केंद्रे उद्यापासून (ता. १) बंद होणार आहेत. उपचाराची जबाबदारी आता महापालिकेची उपनगरीय रुग्णालये आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांकडे सोपविण्यात येणार आहे; मात्र खासगी डॉक्टरांकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांना सरकारी यंत्रणेकडून मिळणाऱ्या मोफत तपासण्या व औषधांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत दरवर्षी सुमारे ६० हजार नवीन क्षयरोग रुग्ण आढळतात. त्यापैकी जवळपास १० टक्के रुग्ण औषध प्रतिरोधक क्षयरोगाने बाधित असतात. उपचाराला विलंब झाल्यास या संसर्गजन्य आजाराचा प्रसार वाढण्याचा धोका असतो. मुंबईत २०१३-२०१४ मध्ये औषध प्रतिरोधक क्षयरोगाच्या गंभीर प्रकारांची प्रकरणे वाढल्यानंतर ही विशेष व्यवस्था सुरू करण्यात आली. रुग्ण खासगी डॉक्टरांकडून उपचार घेत असतानाही त्यांना सरकारी यंत्रणेमार्फत महागडी औषधे आणि निदान तपासण्या मोफत मिळत होत्या. स्वयंसेवी संस्था रुग्ण, खासगी डॉक्टर आणि सरकारी यंत्रणा यांच्यात समन्वय साधत होत्या. थुंकीचे नमुने गोळा करणे, तपासण्या करून घेणे, अहवाल पोहोचवणे, औषधांचे वितरण आणि रुग्णांची सरकारी क्षयरोग कार्यक्रमात नोंद करणे अशी कामे त्यांच्याकडून केली जात होती. हिंदुजा, सोमय्या, सर्वोदय आणि वाडिया रुग्णालयांतील केंद्रांचा या व्यवस्थेत समावेश होता.
विशेषतः सरकारी रुग्णालयात जाणे टाळणारे काही मध्यमवर्गीय रुग्ण खासगी डॉक्टरांकडून उपचार घेतात; मात्र तपासण्या आणि औषधे सरकारी यंत्रणेकडून घेतात. स्वयंसेवी संस्थांची मदत बंद झाल्याने अशा रुग्णांना सरकारी सुविधांशी जोडणे कठीण होऊ शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, खासगी डॉक्टरांकडून उपचार घेणाऱ्या रुग्णांनाही सरकारी केंद्रांतून औषधे आणि आवश्यक तपासण्या उपलब्ध करून दिल्या जातील, असे राज्याच्या क्षयरोग कार्यक्रमातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
...
पुनरावृत्तीमुळे निर्णय
राज्याच्या क्षयरोग कार्यक्रमातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, गेल्या १२ वर्षांत सरकारी प्रयोगशाळा आणि औषध वितरण केंद्रांची क्षमता वाढली आहे. त्यामुळे एनजीओ आणि सरकारी यंत्रणेकडून होणाऱ्या कामांमध्ये काही प्रमाणात पुनरावृत्ती होत असल्याने ही व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. निधीअभावी हा निर्णय घेतलेला नसल्याचेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
...
भागीदारी वाढवा!
छातीविकारतज्ज्ञ डॉ. विकास ओसवाल यांनी क्षयरोग निर्मूलनासाठी सरकारी यंत्रणेसोबत खासगी क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. ही भागीदारी कमी करण्याऐवजी अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : पंतप्रधान मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या भेटीदरम्यान आम्ही खलाशांचा मुद्दा उपस्थित केला

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT