मुंबई

मुंब्रा-ठाणे मार्गावर ‘हिट अँड रन’

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : मुंब्रा आणि डायघर या परिसरात एकाच दिवशी झालेल्या दोन वेगवेगळ्या ‘हिट अँड रन’ अपघातांत दोन जणांचा मृत्यू, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. एका घटनेत मायलेकाचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पहिल्या घटनेत मुंब्रा येथे ईदसाठी माहेरी गेलेल्या पत्नी व एक वर्षाच्या मुलासह दुचाकीवरून भिवंडीकडे निघालेल्या कुटुंबाला अवजड वाहनाने शनिवारी (ता. २९) धडक दिली. साजिद शाईन हे पत्नी व दोन मुलांना दुचाकीवरून घेऊन मुंब्रा येथून भिवंडीकडे जात होते. रेल्वे उड्डाणपुलाजवळ, निरंकारी बाबा हॉल परिसरात मागून आलेल्या अवजड वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. चौघेही रस्त्यावर पडले. मात्र, चालक वाहन न थांबवता पळून गेला. या दुर्घटनेत सानिया आणि मुलगा शाहजेब यांचा मृत्यू, तर साजिद आणि त्यांचा दुसरा मुलगा जखमी झाला. जखमींना कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत मुंब्रा येथून उत्तरशिवकडे दुचाकीने जात असलेल्या ऐजाजुद्दीन खान (वय ३२) यांना भरधाव ट्रकने धडक दिली. धडकेनंतर त्यांची दुचाकी पुढे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकवर आदळली. गंभीर जखमी ऐजाजुद्दीन यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : दम्मम-दिल्ली एअर इंडियाच्या विमानाचे अहमदाबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT