मुंबई

शालेय विद्यार्थ्यांनी साठी उद्बोधन घनकचरा व्यवस्थापन काळाची गरज*

CD

घनकचरा व्यवस्थापनाचे विद्यार्थ्यांना धडे
फडके विद्यालयात जाणीव जागृती व्याख्यानाचे आयोजन
पनवेल, ता. ३१ ः शहरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना म्हणून पनवेल पालिका शिक्षण विभाग आणि आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ‘घनकचरा व्यवस्थापनाबाबत जाणीव जागृती’ या विषयावर विशेष सत्राचे आयोजन केले होते. गुरुवारी (ता. २७) विद्यालयात पार पडलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी कचरा वर्गीकरणाचे धडे गिरवले.
या वेळी प्रमुख वक्ते गिरीश आढाव यांनी अत्यंत सोप्या व ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी कचऱ्याचे विविध प्रकार, त्यांचे योग्य वर्गीकरण आणि अंतिम व्यवस्थापन कसे करावे, याबाबत सविस्तर माहिती दिली. या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष ओला कचरा, सुका कचरा, घातक कचरा आणि ई-कचरा अशा निरनिराळ्या गटांत कचऱ्याचे वर्गीकरण केले.
स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी म्हणून विद्यार्थ्यांसाठी पालिकेने विविध कार्डद्वारे खेळ घेतले. स्वच्छता सापशिडी व पर्यावरणपूरक खादीचे पाऊच, कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी तीन मोठ्या बॅगा विद्यालयास भेट म्हणून दिल्या. विद्यार्थ्यांनी सर्व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

स्वच्छतेची प्रतिज्ञा
विद्यार्थी, मुख्याध्यापिका, शिक्षक व शालेय कर्मचारी या सर्वांच्या समवेत स्वच्छतेची प्रतिज्ञा घेण्यात आली. ‘कचरा वेगळा करुनी पर्यावरण स्वच्छ ठेवूया, पनवेल शहर सुंदर बनवूया’ हा या उपक्रमामागील उद्देश होता. पनवेल पालिका शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रचना पाटील यांनी गिरीश आढाव यांचे आभार मानले. स्वच्छ शाळा, सुंदर शाळा समितीच्या प्रमुख अश्विनी इनामदार उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंकी भिसे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : दम्मम-दिल्ली एअर इंडियाच्या विमानाचे अहमदाबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT