मुंबई

उल्हासनगरात गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा

CD

उल्हासनगर, ता. १ (बातमीदार) : आगामी गणेशोत्सवानिमित्त शिवसेना शहर शाखा, उल्हासनगर विधानसभा १४१ यांच्या वतीने शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांसाठी ‘गणेशोत्सव स्पर्धा २०२६’चे आयोजन केले आहे. उत्कृष्ट सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्य करणाऱ्या मंडळांना रोख पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या मंडळाला २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला १५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाला ११ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट आरती, सजावट आणि स्वच्छता या स्वतंत्र गटांसाठी प्रत्येकी पाच हजार १०० रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. गोल मैदान येथील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत स्पर्धेची घोषणा करण्यात आली. शिवसेना महानगरप्रमुख तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख तथा नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर महाराज आणि युवासेना कल्याण लोकसभा सचिव विक्की भुल्लर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. यावेळी प्रमोद पांडे, जयकुमार केणी, नीलेश देशमुख, अरुण तांबे, विनोद साळेकर, जीतू उपाध्याय, आदेश पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गणेशोत्सव मंडळांमध्ये स्वच्छता, सामाजिक संदेश, पर्यावरणपूरक उत्सव आणि आकर्षक सजावटीला चालना मिळावी, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आल्याचे चौधरी आणि भुल्लर महाराज यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईटवर बंदी; पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय

Astrology: पुढच्या 48 तासांत बदलतीये ग्रह दशा! चमकणार 'या' राशींचे नशीब; धनलाभासह मिळतील मोठ्या आनंदाच्या बातम्या

Gas Cylinder : घरगुती वापराचा सिलिंडर, खाऊगल्लीत ‘सरेंडर’; शहरातील वाढत्या प्रकारांकडे भरारी पथकांचा काणाडोळा

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, मराठा आंदोलकांकडून शोले स्टाईल आंदोलन

Manoj Jarange Patil : उपाशीपोटी कोणी राहू नये म्हणून... आंतरवालीत 3 क्विंटल दाळबाटी!

SCROLL FOR NEXT