मुंबई

नेरुळच्या प्रवेशद्वारावर ‘चार इंची’ खड्डा

CD

नेरूळच्या प्रवेशद्वारावर चार इंची खड्डा
प्रशासनाचे दुर्लक्ष, अपघाताची टांगती तलवार
जुईनगर, ता. १ (बातमीदार) : नेरूळ गावातील उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळ रस्त्यावर पडलेले खड्डे गेल्या अनेक दिवसांपासून जैसे थे असल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये असंतोष पसरला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची खोली वाढतच चालली असून, यासंदर्भात वारंवार वृत्त प्रसिद्ध होऊनही पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.
नेरूळ रेल्वे स्थानकाकडून पश्चिमेकडील विविध सेक्टरकडे जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे कार्यालयीन वेळेत या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा महत्त्वाच्या मार्गावर गेल्या महिनाभरापासून खड्डे पडलेले असतानाही त्यांची दुरुस्ती न झाल्याने वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी असलेल्या खड्ड्यांपैकी एका खड्ड्याची खोली जवळपास चार इंच झाली असून, त्यात वाहन आदळल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा खड्डा अधिक धोकादायक ठरत आहे. खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनाचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
पालिकेची वाहने दररोज या खड्ड्याजवळून जात असतानाही गेल्या महिनाभरापासून दुरुस्तीची कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे पालिका अभियंता विभाग नेमका कोणत्या कारणामुळे या खड्ड्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन एखाद्या नागरिकाला जीव गमवावा लागल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. खड्ड्यांची तातडीने पाहणी करून त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


मी स्वतः याबाबत संबंधित अभियंता विभागाला फोन करून खड्ड्यांची कल्पना देऊन बुजवण्याची विनंती केली होती. दरम्यान, चार दिवस उलटूनदेखील हे खड्डे बुजवलेले नाहीत. त्यामुळे अजूनही नागरिकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास मनसे स्टाईलने कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात जाऊन खड्डेसम्राट पुरस्कार देऊ.
- सविनय म्हात्रे उपशहर अध्यक्ष मनसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : केंद्रिय मंत्रीमंडळात फेरबदल? महाराष्ट्रातील 'या' नेत्यांचा पत्ता कट होणार?, संभाव्य नावे समोर

India T20I Squad: संजू सॅमसनचं कमबॅक! अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर;बुमराह खेळणार की नाही?

Kalamb News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपळगाव डोळा येथे रास्ता रोको; तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

Shirur News : पूजा गई यांचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यु झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी; पती राहुल देवीदास गई यांची मागणी

Marathi News Live Updates : सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल, मनोज जरांगेंची घेणार भेट

SCROLL FOR NEXT