मुंबई

वाशी हायवे बस थांब्यावर निवारा शेड उभारा

CD

वाशी हायवे बस थांब्यावर निवारा शेड उभारा
प्रवाशांना ऊन-पावसात करावी लागते बसची प्रतीक्षा
तुर्भे, ता. १ (बातमीदार) ः वाशी गावाकडून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरील न्यू एरा हॉस्पिटलजवळील बस थांब्यावर निवारा शेड नसल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी कायमस्वरूपी निवारा शेड उभारण्याची जोरदार मागणी होत आहे.
या बस थांब्यावरून बेस्ट आणि एनएमएमटीच्या बसेस नियमित धावतात. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र, प्रवाशांसाठी कोणताही निवारा शेड नसल्याने विशेषतः पावसाळ्यात मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांना रस्त्याकडेला पावसात भिजत बसची प्रतीक्षा करावी लागते, तर उन्हाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होते. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि विद्यार्थ्यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असूनही संबंधित प्रशासनाकडून अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे या बस थांब्यावर तातडीने प्रशस्त व सुरक्षित निवारा शेड उभारावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

वाशी हा नवी मुंबई शहराचा महत्त्वाचा भाग आहे. मुंबईतून नवी मुंबईत प्रवेश केल्यावर हा पहिला बस थांबा आहे. परंतु, या ठिकाणी सोयी अपुऱ्या असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. पालिका आणि बेस्ट प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून बस निवारा शेडची उभारणी करावी.
- तबरेज कादरी, स्थानिक रहिवासी, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT