मुंबई

खंदारेतील ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

CD

खंदारेतील ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
चणेरा विभागात शिवसेनेला धक्का; मनोजकुमार शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास
रोहा, ता. १ (बातमीदार) : चणेरा विभागात शिवसेनेला पुन्हा एकदा धक्का बसला असून, खंदारे गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ॲड. मनोजकुमार शिंदे यांच्यावर अलिबाग विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे सांगण्यात आले.
रविवारी सुतारवाडी येथे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विजय मोरे, तालुकाध्यक्ष विनोद पाशीलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार म्हात्रे, समीर सातपुते, निखिल जाधव, योगिता शिर्के, पूजा विचारे, भालचंद्र मोरे, अशोक सानप, अझर मेमन आदी उपस्थित होते.
या वेळी खंदारे गावातील काशिनाथ महादेव कुळे, देवेश काशिनाथ कुळे, अंकुश कुळे, अमोल कुळे, सचिन कुळे, तेजस कुळे, अक्षय कुळे, प्रणाल कुळे, बबन कुळे, जयवंत कुळे, गजानन बोले, उदय साळवी, रामा बोले, सुधीर कदम, यशवंत यादव आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खासदार सुनील तटकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. चणेरा विभागाच्या विकासासाठी भविष्यात अधिक निधी उपलब्ध करून देत या भागाचा सर्वांगीण विकास साधण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


फोटो कॅप्शन : चणेरा विभागातील खंदारे गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांचे स्वागत करताना खा. सुनील तटकरे, ॲड. मनोजकुमार शिंदे, विनोद पाशीलकर, विजय मोरे आणि अन्य मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : केंद्रिय मंत्रीमंडळात फेरबदल? महाराष्ट्रातील 'या' नेत्यांचा पत्ता कट होणार?, संभाव्य नावे समोर

India T20I Squad: संजू सॅमसनचं कमबॅक! अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर;बुमराह खेळणार की नाही?

Kalamb News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपळगाव डोळा येथे रास्ता रोको; तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

Shirur News : पूजा गई यांचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यु झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी; पती राहुल देवीदास गई यांची मागणी

Marathi News Live Updates : सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल, मनोज जरांगेंची घेणार भेट

SCROLL FOR NEXT