वंशिका चाचे : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : श्री कृष्णजन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमीचा सण अवघ्या काही तासांवर आला असून, या उत्सवासाठी ठाण्यासह विविध भागांमध्ये जय्यत तयारी सुरू झाली आहे. घराघरांमध्ये बाळगोपाळांच्या स्वागताची तयारी पाहायला मिळत असून, बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी जमू लागली आहे. यंदाच्या गोकुळाष्टमीच्या निमित्ताने ठाण्यातील दुकानांत बाळगोपाळांसाठी लागणाऱ्या विविध प्रकारचे पाळणे, मूर्ती, मुकूट, पूजा साहित्य, आसन आदींची मोठी रेलचेल पाहायला मिळत आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची पूजा आणि त्याच्या पाळण्याची सजावट महत्त्वाची असते. ग्राहकांच्या बदलत्या पसंतीनुसार बाजारामध्ये तब्बल २०० पेक्षा जास्त प्रकारच्या आकर्षक पाळण्यांची व्हरायटी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये बाळगोपाळांपासून ते मोठ्या मूर्तींपर्यंत सामावतील अशा सर्व आकारांचे पाळणे उपलब्ध आहेत. प्रामुख्याने ऑक्सीडाईज केलेले सोनेरी रंगाचे कधीही काळे न पडणारे पाळणे, त्यावर सुंदर मिनकारी काम केलेले डिझाईन्स ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. याशिवाय चांदीसारखा लकाकणारा आणि कधीही काळा न पडणाऱ्या पाळण्यांनाही मोठी मागणी आहे, असे दुकानदारांनी सांगितले.
फोल्डिंग पाळण्यावर सुरेख नक्षीकाम
पर्यावरणपूरक आणि पारंपरिक लाकडाला पसंती देणाऱ्या ग्राहकांसाठी शुद्ध सिसम लाकडापासून तयार केलेले पूर्णपणे फोल्डिंग असणारे पाळणे येथे उपलब्ध असून हे पाळणे मुख्य आकर्षणाचे केंद्र बिंदू बनत आहेत. हे फोल्डिंग पाळणे जन्माष्टमी संपल्यानंतर सहजपणे बंद करून सुरक्षितपणे ठेवता येतात, ज्यावर सुरेख नक्षीकाम केलेले असते. या दुकानात अगदी साध्या पाळण्यांपासून ते छोट्या झोपडीच्या आकाराचे पूर्णपणे डिझाईन आणि डेकोरेट केलेले भारी गुणवत्तेचे पाळणेदेखील विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
पितळ-अष्टधातूच्या श्रीकृष्ण मूर्तींचे आकर्षण
पितळ आणि अष्टधातूमध्ये तयार केलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या आकर्षक मूर्तीदेखील २०० रुपयांपासून पुढे खरेदीसाठी उपलब्ध आहेत. ग्राहकांची आवड लक्षात घेऊन येथे सर्व प्रकारच्या सानुकूल आणि सुंदर वस्तूंची रेलचेल असल्याने ठाण्यातील उत्सवाचा उत्साह अधिकच वाढला आहे.
साहित्याचे दर (रुपयांत)
बाळकृष्णाची छोटी मूर्ती - १०० ते ५०
पितळ आणि अष्टधातूच्या मूर्ती - २०० रुपयांपासून पुढे
श्रीकृष्णाची सजावटीची मूर्ती -२०० ते १,०००
सोनेरी, ऑक्सिडाईज्ड पाळणे - २०० ते ८०००
झोपडीच्या आकाराचे सजावटी पाळणे - ८०० ते ८०००
सिसम लाकडाचे पाळणे - २०० ते ८०००
मीनाकारी काम केलेले पाळणे -८०० ते ९००
मोरपिसांचा मुकूट - ५० ते २००
बासरी - ३० ते १५०
फुलांच्या माळा - ३० ते १५०
सजावटीचे तोरण - ५० ते २५०
राधा-कृष्ण सजावट संच - २०० ते ८००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.