मुंबई

मुरबाडमध्ये दहीहंडीचा थरार रंगणार!

CD

टोकावडे, ता. १ (बातमीदार) : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त जनसेवा प्रतिष्ठान, मुरबाड यांच्या वतीने शनिवारी (ता. ५) मुरबाडमध्ये भव्य दहीहंडी उत्सव रंगणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती संकुल, टीडीसी बँकेच्या मागे, शेलकेपाडा येथे हा उत्सव होणार आहे. उत्सवात सहभागी गोविंदा पथकांसाठी थरानुसार आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव रंगणार आहे. आठ थरांसाठी ११ हजार १११ रुपये, सात थरांसाठी ९ हजार ९९९ रुपये, सहा थरांसाठी ७ हजार ७७७ रुपये, पाच थरांसाठी ५ हजार ५५५ रुपये आणि चार थरांसाठी २ हजार २२२ रुपये तसेच सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. दहीहंडी फोडणाऱ्या पथकासाठीही ११ हजार १११ रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या उत्सवाचे खास आकर्षण सिनेअभिनेत्री रुचिरा जाधव यांची उपस्थिती असणार आहे. याशिवाय प्रसिद्ध गायक-कलाकारांचे सादरीकरण आणि लावणी नृत्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. मुरबाड शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दहीहंडीचा थरार अनुभवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रेक्षकांसाठीही बक्षिसांची मेजवानी
दहीहंडी पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ असणार आहे. यामध्ये एक सायकल, तीन मिक्सर, पाच शेगड्या, पाच कुकर आणि पाच शिरस्त्राणे अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यामुळे गोविंदा पथकांसह प्रेक्षकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT