रोह्यात विकासकामांना २.८३ कोटींचा निधी
मुख्य व अंतर्गत रस्त्यांसह मोरीच्या कामांचे भूमिपूजन
रोहा, ता. १ (बातमीदार) : देशाच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू स्थायी समितीचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून रोहा-अष्टमी शहरातील विविध प्रमुख व अंतर्गत रस्ते तसेच स्लॅब ड्रेन्सच्या कामांसाठी दोन कोटी ८३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा रविवारी (ता. ३०) खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
निधीतून डॉ. सी. डी. देशमुख शहर सभागृहासमोरील रस्ता, श्री धावीर मंदिर येथील रस्ता, मिल्लतनगरमधील डीपी रस्ता, अष्टमी नाका ते डायमंड स्कूल, अष्टमी चौक ते मराठी शाळा, म्हाडा वसाहत गेट नं. २ ते इक्बाल धनसे इमारत, प्रभाग क्रमांक ८ मधील दमखाडी एमआयडीसी बायपास ते नदीकिनारा रस्ता व भूमिगत गटार इत्यादी कामे होणार आहेत. तसेच संजय गांधी हॉस्पिटल चौक व कल्पक सोसायटीसमोरील चौक मोरी (स्लॅब ड्रेन) आणि गटारांची कामे करण्यात येणार आहेत.
या वेळी मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, समीर शेडगे, अहमद दर्जी, मुख्याधिकारी अजय कुमार एडके, राजेंद्र जैन, महेश कोलटकर, मयूर दिवेकर, नीता हजारे, महेंद्र गुजर, अजित मोरे, प्रशांत कडू, समीर सकपाळ, समाधान शिंदे, अकीफ येरूणकर, जालिंदर शेवाळे आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : रोह्यात विकासकामांचे भूमिपूजन करताना खा. सुनील तटकरे; समवेत नगराध्यक्ष वनश्री शेडगे आदी मान्यवर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.