उरणमध्ये युरिया खताचा तुटवडा
भातशेती संकटात
उरण, ता. १ (बातमीदार)ः उरण तालुक्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्याने भात उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने तालुक्यातील भातपिके चांगली असून, सध्या पिकांच्या वाढीसाठी खताची आवश्यकता आहे. दरम्यान, अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना हक्काच्या खतासाठी केंद्रांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने १५ ऑगस्टपासून ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ ही ऑनलाइन खत विक्री प्रणाली सुरू केली आहे. शेतकरी आयडी किंवा आधारच्या माध्यमातून प्रणालीवर नोंदणी करून पिकाच्या गरजेनुसार खताची मागणी नोंदवू शकतो. त्यानंतर मिळणाऱ्या क्यूआर कोड किंवा टोकन क्रमांकाद्वारे खत खरेदी करता येते; मात्र ही प्रक्रिया अनेक शेतकऱ्यांना किचकट ठरत आहे. तालुक्यातील अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसल्याने ऑनलाइन प्रणालीचाही त्यांना फारसा उपयोग होत नाही.
त्यातच गुंठेवारी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना संपूर्ण खताची पिशवी खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. पिकाच्या गरजेनुसार कमी प्रमाणात खत उपलब्ध न होणे आणि बाजारातच खताचा तुटवडा असणे, या दुहेरी संकटामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
कृषी केंद्र चालकांकडून खत आणण्यास नकार
तालुका कृषी विभागाने कृषी सेवा केंद्र चालकांना खत उपलब्ध करून देण्यासाठी पत्रे दिली आहेत. मात्र काही केंद्र चालक खत आणण्यास नकार देत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अर्चना सूळ यांनी दिली. याबाबत जिल्हा कृषी विभागालाही कळविण्यात आले असून, लवकरच उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोट
कृषी केंद्र चालकांना खत उपलब्ध करून देण्यासाठी पत्रे दिली आहेत. मात्र काही चालक खते आणण्यास नकार देत आहेत. ही बाब जिल्हा कृषी विभागाच्या निदर्शनास आणून दिली असून, लवकरच योग्य उपाययोजना केली जाईल.
- अर्चना सूळ, तालुका कृषी अधिकारी, उरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.