मुंबई

गणेशोत्सवात कोकण प्रवासासाठी ‘ब्लॅक स्पॉट अॅप’ ठरणार सुरक्षा कवच

CD

गणेशोत्सवात प्रवासासाठी ‘ब्लॅक स्पॉट ॲप’ ठरणार सुरक्षा कवच
अपघातप्रवण ठिकाणांची मिळणार आधीच सूचना; पनवेल आरटीओचे वाहनचालकांना आवाहन

पनवेल, ता. १ (बातमीदार) ः गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे, मुंबई-गोवा तसेच कोकणाकडे जाणाऱ्या महामार्गांवर वाहनांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गणेशभक्त आणि चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा, तसेच अपघातांना प्रभावीपणे आळा बसावा, यासाठी पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ‘ब्लॅक स्पॉट आरटीओ पनवेल’ हे विशेष मोबाईल ॲप विकसित केले आहे. कोकणात जाण्यापूर्वी वाहनचालकांनी हे ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करावा, असे आवाहन आरटीओ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महामार्गांवरील अपघातप्रवण ठिकाणे, धोकादायक वळणे तसेच संभाव्य धोकादायक क्षेत्रांची माहिती या ॲपच्या माध्यमातून वाहनचालकांना मिळणार आहे. वाहन संबंधित ब्लॅक स्पॉटकडे जात असताना ॲपद्वारे पूर्वसूचना आणि अलर्ट मिळणार असल्याने चालकांना वेळीच वाहनाचा वेग कमी करून आवश्यक ती खबरदारी घेता येणार आहे. त्यामुळे अचानक येणाऱ्या धोकादायक वळणांमुळे किंवा अपघातप्रवण ठिकाणांमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यास मदत होणार आहे.

मोफत उपलब्ध
‘ब्लॅक स्पॉट आरटीओ पनवेल’ हे ॲप अँड्रॉइडसाठी गुगल प्ले स्टोअर आणि आयओएससाठी ॲपल ॲप स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. कोकणाकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी हे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून त्याचा प्रभावीपणे वापर करावा, असे आरटीओने म्हटले आहे.

पनवेल आरटीओचे वाहनचालकांना आवाहन
१ गणेशोत्सव काळात महामार्गांवरील वाढती वाहतूक लक्षात घेता वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे, धोकादायक पद्धतीने ओव्हरटेकिंग करू नये, चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्ट, तर दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा अनिवार्य वापर करावा. तसेच, मद्यपान अथवा अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
२ दीर्घ प्रवासादरम्यान थकवा किंवा झोप येत असल्यास वाहन सुरक्षित ठिकाणी थांबवून पुरेशी विश्रांती घ्यावी आणि त्यानंतरच पुढील प्रवास करावा. ‘गणरायाच्या आगमनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सुरक्षित वाहन चालवा आणि आपल्या कुटुंबासह सुरक्षित घरी पोहोचा,’ असा संदेश पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहनचालकांना दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : केंद्रिय मंत्रीमंडळात फेरबदल? महाराष्ट्रातील 'या' नेत्यांचा पत्ता कट होणार?, संभाव्य नावे समोर

India T20I Squad: संजू सॅमसनचं कमबॅक! अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर;बुमराह खेळणार की नाही?

Kalamb News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपळगाव डोळा येथे रास्ता रोको; तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

Shirur News : पूजा गई यांचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यु झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी; पती राहुल देवीदास गई यांची मागणी

Marathi News Live Updates : सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल, मनोज जरांगेंची घेणार भेट

SCROLL FOR NEXT