मुंबई

बांधकाम व्यवसायिकाच्या अपहरण प्रकरणात एक आरोपी अटकेत ;

CD

व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी एकाला अटक

उल्हासनगर, ता. १ (वार्ताहर) : उल्हासनगरच्या गोल मैदानातून बंदुकीच्या धाकाने बांधकाम व्यावसायिक जयराम नेहलानी यांचे सोमवारी (ता. ३१) अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी अनिल जगताप याला पोलिसांनी अटक केली आहे. जगताप याला पोलिसांकडून मंगळवारी (ता. १) न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. प्राथमिक तपासात ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी नेहलानी यांचे अपहरण करण्यात आल्याचे समोर आले आहे.

जयराम नेहलानी सोमवारी मॉर्निंग वॉकसाठी गोल मैदानात गेले होते. मैदानातून बाहेर पडत असताना चार जणांनी त्यांना अडवले. नेहलानी यांनी त्यांच्याबरोबर जाण्यास विरोध केल्यानंतर एकाने बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्या डोक्यावर हल्ला केला आणि स्कॉर्पिओ गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर आरोपींनी नेहलानी यांच्या मुलाला फोन करून ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या निर्देशानुसार आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि नेहलानी यांची सुखरूप सुटका करण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र आठ पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि फोन कॉलच्या आधारे आरोपींचा माग काढत सोमवारी सायंकाळी खडवली रेल्वे स्थानकाजवळ नेहलानी यांची सुटका केली.
या प्रकरणात आरोपी अनिल जगताप याला अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार आहेत. मंगळवारी न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपी अनिल जगताप याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासोबतच पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Eknath Shinde Delhi Visit : एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौरावर; धनुष्यबाण चिन्ह गोठणार?, मुलगा श्रीकांत शिंदेंना मंत्रीमंडळात संधी मिळणार?

Ranji Trophy: शार्दुल ठाकूरला कर्णधारपदावरून काढलं, मग नवा कॅप्टन कोण? मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय

MPSC Exam : ‘एमपीएससी’ परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणा; स्पर्धा परीक्षा शिक्षक, विद्यार्थ्यांची मागणी

Marathi News Live Updates : सावरगाव परिसरात वन्यजीवांच्या शिकारीचा प्रयत्न, दोन आरोपी फरार; बंदुकीसह दुचाकी जप्त

Wagholi Crime : दागिने चोरी करणारी आंतरराज्यीय महिला टोळी जेरबंद; मध्यप्रदेश मधील सहा महिलांचा समावेश

SCROLL FOR NEXT