मुंबई

धूळ शोषून घेणार आधुनिक वाहने

CD

धूळ शोषून घेणार आधुनिक वाहने
२९ वाहने तैनात करण्याचे नियोजन; रस्ते, दुभाजक धुण्यासह झाडांनाही पाणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबईत सध्या सुरू असलेली पायाभूत सुविधांची कामे आणि वाढत्या बांधकामांमुळे धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन हवेची गुणवत्ता खालावत असते. पारंपारिक पद्धतीने झाडू मारल्याने धूळ हवेतच उडते. यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी मुंबई महापालिकेने द सक्शन स्प्रिंकलर मल्टिपर्पज व्हेइकल हे आधुनिक बहुउद्देशीय वाहन ताफ्यात समाविष्ट केले आहे. टप्प्याटप्प्याने ही वाहने दाखल होणार असून, या माध्यमातून धुळीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
​खासकरून हिवाळ्यात वाढणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत प्रभावी ठरणार आहे. पालिकेकडे सध्या पाच वाहने कार्यरत असून एफ उत्तर, आर सेंट्रल, एम पूर्व, पी पश्चिम आणि एच पूर्व विभागात लवकरच आणखी वाहने दाखल होत आहेत. येत्या काळात मुंबईभरात अशी एकूण २९ आधुनिक वाहने तैनात केली जाणार आहेत.
हे आधुनिक वाहन केवळ धूळ शोषून घेण्यापुरते मर्यादित नसून, रस्त्यावरील पाच प्रमुख कामे एकाच वेळी पार पाडणारे बहुउद्देशीय यंत्र आहे. यात तीन ते ५० मायक्रोनपर्यंतचे अतिसूक्ष्म धूलिकण सहज ओढून घेण्याची क्षमता असल्याने हवेची शुद्धता राखण्यास मोठी मदत होते. याशिवाय हे वाहन रस्त्यावरील दुभाजकांची स्वच्छता व धुलाई करण्यासोबतच मुख्य रस्त्यांची थेट धुलाईदेखील करते. हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी यातून धुके फवारणी (फॉगिंग व मिस्टिंग) केली जाते, तर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांना पाणी देऊन त्यांची निगा राखण्याचे कामही या एकाच वाहनाद्वारे प्रभावीपणे केले जाते.

६० कोटी खर्च करणार
​ही वाहने अत्याधुनिक असून या वाहनांमध्ये बसवलेल्या मिस्टिंग गन्सद्वारे हवेत पाण्याचे अतिसूक्ष्म तुषार फवारले जातात. यामुळे हवेत तरंगणारे धुळीचे कण जड होऊन जमिनीवर बसतात. वाहनाचे सक्शन चेंबर भरल्यानंतर गोळा झालेली धूळ वेस्ट कलेक्शन व्हॅनद्वारे थेट डेब्रिज प्रोसेसिंग सेंटरकडे रिसायकलिंगसाठी पाठवली जाते. ही सर्व कामे ऑटोमॅटिक होणार असून, यामुळे वेळ आणि मनुष्यबळही वाचणार आहे. यासाठी सुमारे आठ ते दहा कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

वाहनाचे फायदे
- ​सूक्ष्म धूलिकण नियंत्रण : ३ ते ५० मायक्रोनपर्यंतचे बारीक धूलिकण ओढून घेणे
- ​दुभाजक स्वच्छता : रस्त्यावरील दुभाजकांची स्वच्छता व धुलाई
- ​फॉगिंग व मिस्टिंग : हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी धुके फवारणी
- ​झाडांची निगा : रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांना पाणी देणे
- ​रस्त्यांची धुलाई : मुख्य रस्त्यांवरील धूळ धुवून काढणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महापालिकेच्या बैठकीत शारंगधर देशमुख- आदिल फरास यांच्यात जोरदार वाद; पालिकेच्या दारात कार्यकर्ते एकवटले

Shahajibapu Patil : ‘आम्ही उष्टे खाणारे नाही; तुमचे तुम्हाला राहू द्या’; सरकारने मराठा आरक्षणाबाबत तत्काळ निर्णय घ्यावा

Mhada House: म्हाडाचा गेमचेंजर निर्णय! विक्रीविना पडलेल्या घरांचा होणार 'असा' वापर; सर्वसामान्यांसाठी मोठी संधी

Marathi News Live Updates : एसआरपीएफ जवानाकडून गोळी झाडून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, मानेत गोळी लागल्याने प्रकृती चिंताजनक

Modi Cabinet Reshuffle : केंद्रिय मंत्रीमंडळात फेरबदल? महाराष्ट्रातील 'या' नेत्यांचा पत्ता कट होणार?, संभाव्य नावे समोर

SCROLL FOR NEXT