मुंबई

विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्याचा निर्णय योग्यच!

CD

विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्याचा निर्णय योग्यच!

मुंबई, ता. १ : शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सचोटी राखणे, हे अभ्यासक्रम जवळपास पूर्ण करणे किंवा नोकरी मिळवणे या गोष्टींपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, असे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदवले आणि बनावट शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारावर प्रवेश मिळवलेल्या तीन विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याचा ‘जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’चा (जेबीआयएमएस) निर्णय कायम ठेवला.
‘मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’ या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमातील प्रवेश मार्च महिन्यात रद्द करण्यात आल्याबद्दल यश गायकवाड, विशाल गुप्ता आणि गौतम नायर या तीन विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती; मात्र या विद्यार्थ्यांनी ‘आखाती देशांमधील भारतीय कामगारांची मुले’ या श्रेणीअंतर्गत प्रवेश मिळवला होता; मात्र प्रवेशादरम्यान सादर केलेली शैक्षणिक कागदपत्रे आणि विद्यापीठाकडील त्यांची प्रत्यक्ष शैक्षणिक नोंदीत गंभीर विसंगती असल्याचे संस्थेच्या निदर्शनास आले. तसेच त्यांचे खरे शैक्षणिक गुण विचारात घेतले असते, तर त्यांना प्रवेश मिळाला नसता, असेही निरीक्षण न्या. रियाझ छागला आणि न्या. फरहान दुबाश यांच्या खंडपीठाने त्यांच्या याचिका फेटाळून लावताना नोंदवले.  संस्थात्मक यंत्रणेद्वारे ही अनियमितता घडली, तिचीही तपासणी होणे आवश्यक असल्याचे नमूद करून जबाबदारी निश्चित झाल्यास योग्य ती कारवाई केली जावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loose Oil Sale Maharashtra : मोठा निर्णय! देवेंद्र फडणवीसांकडून तुकाराम मुंढेंच्या आदेशाला केराची टोपली? सुटे खाद्यतेल विक्रीला परवानगी

कर्जाचा तगादा, पतीसह पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; पलूस तालुका हादरवणारी घटना

FDA Action : ‘ब्लिंक कॉमर्स’चा परवाना निलंबित! अस्वच्छतेच्या त्रुटी कायम; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Marathi News Updates : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune News : चारच्या पुढे बेस-टॉप असल्यास गुन्हा दाखल होणार; साऊंड सिस्टिम जप्त करण्याचा पोलिसांचा इशारा

SCROLL FOR NEXT