आयुष्यभराच्या जमापुंजीसाठी झगडा
गुंतवणुकीच्या परताव्यासाठी ऑनलाइन केंद्रांवर गर्दी
कासा, ता. २ (बातमीदार) ः रॉयल ट्विंकल स्टार क्लब, सीट्स चेक इन्स कंपन्यांमध्ये अडकलेली गुंतवणुकीची रक्कम परत मिळण्यासाठीची दुसऱ्या टप्प्यातील ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे परताव्याची रक्कम मिळवण्यासाठी कासा परिसरातील ऑनलाइन केंद्रांमध्ये गुंतवणूकदारांची गर्दी होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवृत्त न्यायमूर्ती कुऱ्हेकर समितीमार्फत परताव्यासाठी अधिकृत पोर्टल सुरू करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात पात्र गुंतवणूकदारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. कासा येथील विविध इंटरनेट, ऑनलाइन केंद्रांवर २०० रुपये शुल्क आकारताना नागरिकांचे अर्ज भरले जात आहेत.
------------------
१४ सप्टेंबरपर्यंत संधी
- गुंतवणुकीची रक्कम कितीही असली तरी पात्र गुंतवणूकदारांना पाच हजार रुपयांपर्यंतच्या परताव्यासाठी अर्ज करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात अर्ज करण्यापासून वंचित राहिलेले पात्र गुंतवणूकदार अर्ज करू शकतात.
- ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाली असून १४ सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे अंतिम मुदतीपूर्वी दावा दाखल करण्यासाठी गुंतवणूकदारांना संधी आहे.
-------------------
‘ही’ कागदपत्रे अनिवार्य
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक नागरिकांनी या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. अर्ज करताना गुंतवणूकदारांनी मूळ प्रमाणपत्रे, गुंतवणुकीची कागदपत्रे, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक तसेच रद्द केलेला धनादेश (कॅन्सल चेक) आदी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे गरजेचे आहे.
-------------------------
परताव्याच्या प्रक्रियेबाबत आजच माहिती मिळाली. त्यामुळे अर्ज करण्यासाठी आलो आहे. आवश्यक कागदपत्रांची माहिती घेत आहे. चार वर्षांपूर्वी योजनेत ५० हजार रुपये गुंतवले होते.
- कल्पेश घाटाळ, गुंतवणूकदार, वेती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.