मुंबई

दीर्घ सेवा बजावणाऱ्या प्रवासी वाहतूक चालकांचा सन्मान

CD

ठाणे शहर, ता. १ (बातमीदार) : प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडणाऱ्या प्रवासी वाहतूक चालकांच्या दीर्घ सेवेचा गौरव करण्यात येणार आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या ‘निवृत्ती सन्मान योजने’अंतर्गत ६५ वर्षे पूर्ण केलेल्या चालकांना सन्मान निधी प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम गुरुवारी (ता. ३) सायंकाळी ८ वाजता गडकरी रंगायतन येथे होणार आहे.
महाराष्ट्राच्या प्रवासी वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या चालकांच्या दीर्घ सेवेची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यासाठी राज्य सरकारच्या परिवहन विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी गडकरी रंगायतनात होणाऱ्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, प्रमुख अतिथी म्हणून वनमंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री तथा कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रा. प्रदीप ढवळ यांच्यासह खासदार, डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार सुरेश म्हात्रे यांच्यासह विधान परिषद व विधानसभा सदस्य, परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ६५ वर्षे पूर्ण केलेल्या प्रवासी वाहतूक चालकांच्या प्रदीर्घ सेवेचा गौरव करत त्यांना सन्मान निधी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांच्याविरोधात पोलिस तक्रार देणार; शिक्षणतज्ज्ञ धनंजय कुलकर्णींकडून 'नक्षली' असा उल्लेख

सायबर कॅफेतून सुरू झाला प्रवास, २७-२८ चित्रपटांचा अनुभव; आता रोहन शाह करणार निर्मितीची नवी सुरुवात

Champions Trophy Dates: भारतात महिला वर्ल्ड कपनंतर रंगणार चॅम्पियन्स ट्रॉफी! कधी अन् कोणत्या शहरात होणार सामने? ICC ची घोषणा

Mumbai ST Stop Demand: मुंबई-सातारा-कराड-कोल्हापूर एसटी बसला चेलाडी फाटा येथे अधिकृत थांबा देण्याची आमदार शंकर मांडेकर यांची परिवहन मंत्र्याकडे मागणी

पहिलीच मालिका हिट पण नंतर कुठे गायब झाली 'येऊ कशी तशी मी नांदायला'ची स्वीटू? करिअरच्या टॉपवर असतानाच घेतलेला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT