मुंबई

सात महिन्यांनंतर स्वीकृत सदस्यांना मुहूर्त

CD

उल्हासनगर, ता. २ (वार्ताहर) : सात महिन्यांची प्रतीक्षा, पक्षांतर्गत रस्सीखेच आणि बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर उल्हासनगर महापालिकेतील सात स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ११ सप्टेंबरच्या विशेष महासभेत सात नावांवर शिक्कामोर्तब होणार असून, महापौर शिवसेनेचा असला तरी संख्याबळाच्या नव्या गणितात भाजपला चार, तर शिवसेनेला तीन जागा मिळणार आहेत.

जानेवारीतील महापालिका निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेने एकत्र सत्ता स्थापन केली. ज्यात ७८ पैकी ७७ नगरसेवक सत्ताधारी गटात आले, मात्र स्वीकृत सदस्य पदासाठी दोन्ही पक्षांत इच्छुकांची भाऊगर्दी, अंतर्गत रस्सीखेच आणि राजकीय कुरघोड्यांमुळे नियुक्ती रखडली होती. सुरुवातीच्या संख्याबळानुसार शिवसेनेला चार जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, शिवसेनेच्या दोन नगरसेवकांच्या अपात्रतेनंतर संपूर्ण गणितच बदलले आहे. 

३७ नगरसेवक असलेला भाजप आता महापालिकेतील सर्वाधिक संख्याबळाचा गट ठरल्याने सातपैकी चार जागांवर भाजप, तर तीन जागांवर शिवसेनेचे सदस्य नियुक्त होणार आहेत. महापौरपद शिवसेनेकडे असले तरी स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीत भाजपचे पारडे जड झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः निवडणुकीत पराभूत झालेल्या ज्येष्ठांना पुन्हा सभागृहात संधी मिळणार की पक्षनिष्ठ नव्या चेहऱ्यांची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अर्ज ७ सप्टेंबरला सादर करावे लागणार 
सात स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीसाठी सात महिन्यांपासून सुरू असलेली राजकीय प्रतीक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. ११ सप्टेंबरला विशेष महासभेत या सात सदस्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब होणार आहे. इच्छुक उमेदवारांना ७ सप्टेंबरला दुपारी १२ ते २ या वेळेत अर्ज सादर करावे लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुकेश अंबानींची रिलायन्स आता आईस्क्रीमही बनवणार, अवघ्या १० रुपयांत लाँच केले प्रॉडक्ट, दिग्गज कंपन्याची उडाली झोप

Gokulashtami 2026: मोरपीस ते बासरी! जन्माष्टमीआधी घरात 'या' ५ वस्तू आणणे मानले जाते अत्यंत शुभ; जाणून घ्या वास्तू नियमावली..

Nutrition Week : वजन घटवण्यासाठी फायबर इतकं महत्त्वाचं का? AIIMSच्या डॉक्टरांनी सांगितलं ‘हे’ कारण

Manwat News : मानवत नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा ७ व्या दिवशीही कामबंद लढा कायम; तोडगा न निघाल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Mumbai Rain Update: मुंबईचं हवामान अचानक बदललं, मुसळधार पावसाची सुरुवात; कसा असेल पुढील २ दिवसाचा अंदाज?

SCROLL FOR NEXT