मुंबई

गो-पालनातून सेंद्रिय शेतीला बळ

CD

गोपालनातून सेंद्रिय शेतीला बळ
गुजरात अभ्यास दौऱ्यात पोलादपूरच्या शेतकऱ्यांना कृषिक्रांतीचे धडे
पोलादपूर, ता. २ (बातमीदार) : रासायनिक शेतीच्या दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला गोपालनाची जोड देऊन उत्पादन खर्च कमी करण्याच्या उद्देशाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’अंतर्गत पोलादपूर तालुक्यातील सेंद्रिय व नैसर्गिक शेती गटातील २५ शेतकऱ्यांचा गुजरात येथे आंतरराज्य अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.
अहमदाबाद येथील बन्सी गीर गोशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक गोपालभाई सुतारिया यांनी ‘गौ कृपा अमृत गोशाळा’ संकल्पनेची सविस्तर माहिती दिली. गीर गायींचे संगोपन, गोमूत्र व गोबरचा शेतीतील वापर, सेंद्रिय निविष्ठांची निर्मिती आणि कमी खर्चातील नैसर्गिक शेती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेणापासून कंपोस्ट खतनिर्मिती, भाजीपाला, केळी लागवड आणि हिरव्या गवताच्या विविध पद्धतींची प्रात्यक्षिकेही दाखविण्यात आली.
अभ्यास दौऱ्यात साबरमती येथील महात्मा गांधींच्या निवासस्थानी भेट देऊन ग्रामविकास व स्वावलंबनाची माहिती घेण्यात आली. तसेच आनंद विद्यापीठात भाताच्या विविध प्रजाती आणि त्यांच्या वैशिष्ट्यांबाबत मार्गदर्शन मिळाले. अमुल इंडस्ट्रीलाही भेट देण्यात आली. दौऱ्याचे नियोजन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कपिल रामराव पाटील यांनी केले.

गोपालनातून खर्चात बचत
गोपालन केवळ दूध उत्पादनापुरते मर्यादित न ठेवता गोबर व गोमूत्रापासून कंपोस्ट, सेंद्रिय खते आणि विविध निविष्ठा तयार केल्यास शेतकऱ्यांना बाजारातून खते व निविष्ठा खरेदी करण्यावरील खर्च कमी करता येतो. त्यामुळे गोपालन आणि नैसर्गिक शेतीचा समन्वय साधल्यास शेती अधिक स्वावलंबी व शाश्वत होण्यास मदत होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांच्याविरोधात पोलिस तक्रार देणार; शिक्षणतज्ज्ञ धनंजय कुलकर्णींकडून 'नक्षली' असा उल्लेख

सायबर कॅफेतून सुरू झाला प्रवास, २७-२८ चित्रपटांचा अनुभव; आता रोहन शाह करणार निर्मितीची नवी सुरुवात

Champions Trophy Dates: भारतात महिला वर्ल्ड कपनंतर रंगणार चॅम्पियन्स ट्रॉफी! कधी अन् कोणत्या शहरात होणार सामने? ICC ची घोषणा

Mumbai ST Stop Demand: मुंबई-सातारा-कराड-कोल्हापूर एसटी बसला चेलाडी फाटा येथे अधिकृत थांबा देण्याची आमदार शंकर मांडेकर यांची परिवहन मंत्र्याकडे मागणी

पहिलीच मालिका हिट पण नंतर कुठे गायब झाली 'येऊ कशी तशी मी नांदायला'ची स्वीटू? करिअरच्या टॉपवर असतानाच घेतलेला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT