मुंबई

भावाच्या एलआयसी पॉलिसींवर बहिणीचा डल्ला

CD

अंबरनाथ, ता. २ (वार्ताहर) : बनावट सह्या आणि कागदपत्रांचा आधार घेत एलआयसीच्या दोन पॉलिसींवर तब्बल १४ लाख ९० हजार ४७ रुपयांचे कर्ज परस्पर उचलून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील मुख्य आरोपी ही फिर्यादीचीच बहीण असल्याने याला कौटुंबिक वादाचीही किनार आहे. याप्रकरणी सुरेखा बोर्डे यांच्यासह एलआयसीच्या तीन तत्कालीन व्यवस्थापकांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सबास्टिएन बोर्डे (वय ५५, रा. निसर्ग ग्रीन लोटस, बी-केबिन रोड, अंबरनाथ पूर्व) यांच्या भावाच्या नावावर एलआयसीच्या अंबरनाथ पूर्व शाखेत दोन पॉलिसी होत्या. सुरेखा बोर्डे यांनी अन्य आरोपींशी संगनमत करून ब्रिटनमधील बनावट सह्यांचे दस्तऐवज तयार केल्याचा आरोप आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे अंबरनाथ शाखेतील दोन्ही पॉलिसी उल्हासनगर शाखेत वर्ग करण्यात आल्या. त्यानंतर ४ मे २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत त्यावर १४ लाख ९० हजार ४७ रुपयांचे कर्ज काढण्यात आले. या प्रकरणात सुरेखा बोर्डे, एलआयसी अंबरनाथ शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक; तसेच उल्हासनगर शाखेतील दोन तत्कालीन व्यवस्थापक अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुकेश अंबानींची रिलायन्स आता आईस्क्रीमही बनवणार, अवघ्या १० रुपयांत लाँच केले प्रॉडक्ट, दिग्गज कंपन्याची उडाली झोप

Gokulashtami 2026: मोरपीस ते बासरी! जन्माष्टमीआधी घरात 'या' ५ वस्तू आणणे मानले जाते अत्यंत शुभ; जाणून घ्या वास्तू नियमावली..

Nutrition Week : वजन घटवण्यासाठी फायबर इतकं महत्त्वाचं का? AIIMSच्या डॉक्टरांनी सांगितलं ‘हे’ कारण

Manwat News : मानवत नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा ७ व्या दिवशीही कामबंद लढा कायम; तोडगा न निघाल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Mumbai Rain Update: मुंबईचं हवामान अचानक बदललं, मुसळधार पावसाची सुरुवात; कसा असेल पुढील २ दिवसाचा अंदाज?

SCROLL FOR NEXT