मुंबई

वाशीत चुकीच्या ठिकाणी बस शेड

CD

वाशीत चुकीच्या ठिकाणी बस शेड
प्रवासी निवाऱ्याअभावी नागरिकांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २ : सायन-पनवेल महामार्गावर मुंबईहून वाशीच्या दिशेने येताना न्यू एरा हॉस्पिटल (व्होकार्ट हॉस्पिटल)समोरील बसथांब्यावर प्रवासी निवारा शेड चुकीच्या ठिकाणी उभारण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रत्यक्ष बसथांब्याच्या ठिकाणी शेड नसून ते काही अंतरावर पुढे उभारण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना ऊन-पावसात उघड्यावर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. ही शेड तातडीने बसथांब्याच्या योग्य ठिकाणी स्थलांतरित करावे, अशी मागणी नगरसेविका प्रीती संदीप भगत यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
या बसथांब्यावरून एनएमएमटी, बेस्ट आणि एसटीच्या माध्यमातून वाशीगाव तसेच सेक्टर ४, ५, ६, ७ व ८ मधील शेकडो नागरिक दररोज प्रवास करतात. मुख्य बसथांब्याच्या ठिकाणी निवारा नसल्याने प्रवाशांना महामार्गाच्या कडेला अथवा झाडांच्या सावलीत थांबावे लागते. यापूर्वी २५ एप्रिल २०२५ रोजी माजी नगरसेविका फशीबाई करसन भगत यांनीही फोटोसह प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तीव्र उन्हामुळे एका ज्येष्ठ प्रवाशाला भोवळ येऊन अपघात झाल्याची घटनाही पत्रात नमूद करण्यात आली होती. वारंवार पाठपुरावा करूनही समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. पावसाळा व उन्हाळ्यातील प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन निवारा शेड मूळ बसथांब्याच्या ठिकाणी तातडीने हलवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुकेश अंबानींची रिलायन्स आता आईस्क्रीमही बनवणार, अवघ्या १० रुपयांत लाँच केले प्रॉडक्ट, दिग्गज कंपन्याची उडाली झोप

Nutrition Week : वजन घटवण्यासाठी फायबर इतकं महत्त्वाचं का? AIIMSच्या डॉक्टरांनी सांगितलं ‘हे’ कारण

Manwat News : मानवत नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा ७ व्या दिवशीही कामबंद लढा कायम; तोडगा न निघाल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Mumbai Rain Update: मुंबईचं हवामान अचानक बदललं, मुसळधार पावसाची सुरुवात; कसा असेल पुढील २ दिवसाचा अंदाज?

सर्किटचा ‘डार्क’ अवतार! अर्शद वारसीच्या ‘महाराज’ भूमिकेने वाढवलं ‘घमासान’चं गूढ, खाकी वर्दीत प्रतीक गांधींचा दमदार अंदाज

SCROLL FOR NEXT