मुंबई

२१ लाखांच्या पथदिवे स्थलांतरावर संशय

CD

२१ लाखांच्या पथदिवे स्थलांतरावर संशय
ज्वेल ऑफ नवी मुंबईतील कामाची चौकशी करण्याची मागणी
जुईनगर, ता. २ (बातमीदार) : नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात फॉर्म्युला ४ नाईट रेसिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रस्ता दुभाजकावरील पथदिवे स्थलांतरित करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने २१ लाख ६ हजार २३ रुपयांचे काम प्रस्तावित केले आहे. मात्र, निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच या कामाचा काही भाग प्रत्यक्षात झाल्याचा संशय व्यक्त होत असल्याने कामाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे उप शहरप्रमुख समीर बागवान यांनी महापालिका कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.
कामाच्या अंदाजपत्रकात ९० नग आरसीसी पायाभरणी, सुमारे दोन हजार ३९५ मीटर विद्युत केबल, दोन हजार १५ मीटर वाहिनी आणि ९० पथदिवे खांबांसाठी आवश्यक विद्युत यंत्रणेचा समावेश आहे. त्यामुळे अंदाजपत्रकातील तरतूद आणि प्रत्यक्ष झालेले काम यामध्ये तफावत आहे का, याची मोजमापासह तांत्रिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी झालेले, सध्या प्रस्तावित असलेले आणि प्रत्यक्ष आवश्यक असलेले काम यांचा तुलनात्मक आढावा घेऊन दुबार काम अथवा दुबार खर्च झाला आहे का, हेही तपासण्याची मागणी बागवान यांनी केली आहे.

कागदपत्रांचीही तपासणी आवश्यक
चौकशी करताना केवळ प्रत्यक्ष कामाची पाहणी न करता मोजमाप नोंद, कामाचे आदेश, प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी तसेच संबंधित देयकांची तपासणी करावी. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच काम झाले असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी. सार्वजनिक निधीचे नुकसान झाल्याचे आढळल्यास संबंधितांकडून नुकसानाची रक्कम वसूल करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

सार्वजनिक पैशातून होणाऱ्या कामात नियम, पारदर्शकता आणि तांत्रिक अचूकता अत्यावश्यक आहे. या प्रकरणातील प्रत्येक बाब तपासून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे.
- समीर बागवान, उपशहर प्रमुख, शिवसेना (उबाठा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुकेश अंबानींची रिलायन्स आता आईस्क्रीमही बनवणार, अवघ्या १० रुपयांत लाँच केले प्रॉडक्ट, दिग्गज कंपन्याची उडाली झोप

Nutrition Week : वजन घटवण्यासाठी फायबर इतकं महत्त्वाचं का? AIIMSच्या डॉक्टरांनी सांगितलं ‘हे’ कारण

Manwat News : मानवत नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा ७ व्या दिवशीही कामबंद लढा कायम; तोडगा न निघाल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Mumbai Rain Update: मुंबईचं हवामान अचानक बदललं, मुसळधार पावसाची सुरुवात; कसा असेल पुढील २ दिवसाचा अंदाज?

सर्किटचा ‘डार्क’ अवतार! अर्शद वारसीच्या ‘महाराज’ भूमिकेने वाढवलं ‘घमासान’चं गूढ, खाकी वर्दीत प्रतीक गांधींचा दमदार अंदाज

SCROLL FOR NEXT