मुंबई

‘आभा’ला डिजिटल बळकटी!

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : महाराष्ट्रातील डिजिटल आरोग्य व्यवस्थेला ‘आभा’चा भक्कम आधार मिळाला असून, राज्यात आतापर्यंत सात कोटी ४८ लाख नऊ हजार ६२२ आभा खाती तयार झाली आहेत. ऑगस्ट महिन्यात ११ लाख ३९ हजार २०२ नवीन आभा खाती तयार झाली आहेत. नागरिकांच्या आरोग्यविषयक नोंदी डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला राज्यात वेग आला आहे.

आयुष्मान भारत डिजिटल मिशनअंतर्गत राज्यात आतापर्यंत दोन कोटी ६३ लाख ५७ हजार ७१३ आरोग्य नोंदी लिंक करण्यात आल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात सात लाख ६४ हजार ४६८ आरोग्य नोंदी लिंक झाल्या. त्यामुळे रुग्णांचा उपचाराचा इतिहास, तपासणी अहवाल आणि इतर वैद्यकीय नोंदी डिजिटल माध्यमातून उपलब्ध होण्यास मदत होत आहे.

याशिवाय राज्यातील एक लाख सात हजार ५२८ आरोग्य व्यावसायिकांची पडताळणी झाली आहे. ऑगस्ट महिन्यात सात हजार ५६६ आरोग्य व्यावसायिक या डिजिटल व्यवस्थेत जोडले गेले आहेत. त्यामुळे नागरिक, आरोग्य सुविधा आणि आरोग्य व्यावसायिक यांना एका डिजिटल आरोग्य परिसंस्थेत आणण्याचे काम वेगाने सुरू आहे.

४७ हजारांहून अधिक आरोग्य सुविधा डिजिटल यंत्रणेत
डिजिटल आरोग्य व्यवस्थेचा विस्तार करताना राज्यातील आरोग्य सुविधांनाही हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्रीशी जोडण्यात येत आहे. आतापर्यंत ४७ हजार ३९३ आरोग्य सुविधा एचएफआरवर पडताळण्यात आल्या आहेत. ऑगस्टमध्येच ११ हजार ४९० आरोग्य सुविधांची पडताळणी करण्यात आली.

पुणे आघाडीवर
जिल्हानिहाय आभा निर्मितीत पुणे ६१.५ लाख खात्यांसह आघाडीवर आहे. त्यानंतर ठाणे ४३.८ लाख, नाशिक ४१ लाख, मुंबई ३९.३ लाख, अहिल्यानगर ३२.९ लाख, कोल्हापूर ३१.५ लाख, नागपूर ३१.३ लाख, जळगाव २८.३ लाख, सोलापूर २७.२ लाख आणि छत्रपती संभाजीनगर २४.८ लाख अशी नोंद आहे.

कागदी फाईलऐवजी डिजिटल आरोग्य नोंदी
‘आभा’मुळे नागरिकांच्या आरोग्यविषयक नोंदी डिजिटल पद्धतीने जतन करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. विविध ठिकाणी उपचार घेताना पूर्वीच्या तपासण्या, उपचारांचा इतिहास आणि वैद्यकीय नोंदी उपलब्ध झाल्याने डॉक्टरांना रुग्णाच्या आरोग्यविषयक पार्श्वभूमीचा अधिक सुसंगत आढावा घेणे शक्य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati News : बारामतीच्या पूलावरील प्रकाशयोजनेस अमेरिकेतील पारितोषिक; नेहा दोशी यांच्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल...

Marathi News Live Updates : लक्ष्मण हाकेंनी आंदोलन मागे घेतलं, बावनकुळेंशी फोनवरून चर्चा केल्यानंतर घेतला निर्णय

Nutrition Tips: व्हिटॅमिन D2 की D3? स्नायू अन् हृदयासाठी कोणते व्हिटॅमिन सर्वात उत्तम? ICMR च्या संशोधनातून मोठा खुलासा!

Krishna Janmashtami 2026: ४ की ५ सप्टेंबर? कृष्ण जन्माष्टमी नेमकी कधी? पाहा पूजा आणि पारणाची योग्य वेळ

मुंबईत ठाकरेंना मोठा धक्का, माजी महापौरांचं नगरसेवक पद रद्द; ६ वर्षे निवडणूकही लढता येणार नाही

SCROLL FOR NEXT