सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : ग्रामीण भागातील ठाणे जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा मुख्य अथवा वर्दळीच्या रस्त्यालगत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच महत्त्वाचा ठरतो. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील एक हजार ३२७ शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला. गेल्या चार वर्षांत टप्प्याटप्प्याने एक हजार २९८ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविले असून, उर्वरित २९ शाळांमध्ये बसविण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.
ठाणे जिल्ह्यातील दुर्गम तसेच आदिवासी पाड्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा आहेत. त्यातील बहुतांश शाळा रस्त्यालगत आहेत. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. काही शाळांना संरक्षक भिंती नाही. तर काही ठिकाणी विद्यार्थीसंख्या जास्त असलेल्या शाळांच्या आवारातून बालके चोरीला गेल्याचे घटना घडल्या आहेत. अशा गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी प्रत्येक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. याची दाखल घेत, ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने २०२२ मध्ये झेडपीच्या २७ शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली. त्यानंतर पुरेसा निधी उपल्बध होत नसल्याने सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला ब्रेक लागला.
अशातच दोन ते अडीच वर्षांपूर्वी बदलापूर येथे एका शालेय विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना घडली. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आल्याने जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला पुन्हा वेग आला. चार वर्षानंतर जिल्हा नियोजन समितीमार्फत २०२४-२५ मध्ये पहिल्या टप्प्यात ५४२ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत कल्याण तालुक्यात १२०, भिवंडी ३०८ सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाले आहेत. तर अंबरनाथ तालुक्यात ९६ सीसीटीव्ही बसवले असून १८ शाळांतील कामकाज प्रगतिपथावर आहे. आता मुख्य कार्यकरी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केल्याने जिल्हा नियोजन समितीमार्फत २०२५-२६ मधील उपलब्ध निधीतून सीसीटीव्ही बसविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या कामाची गती अधिक वाढल्याने जिल्हा परिषदेच्या एक हजार ३२७ शाळांपैकी एक हजार २९८ शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसल्या असून त्या कार्यान्वित केल्या आहेत. तसेच उर्वरित २९ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम शीघ्रतेने करण्यात आले आहे. यामुळे शाळांमधील वातावरण अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध राहण्यास मदत होणार आहे.
- रणजित यादव, मुख्य कार्यकरी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे
तालुकानिहाय शाळांमधील सीसीटीव्ही
तालुका शाळांची संख्या
शहापूर ४५७
मुरबाड २९९
भिवंडी ३०८
कल्याण १२०
अंबरनाथ ११४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.