मुंबई

गणराच्या स्वागतासाठी ‘लालपरी’ सज्ज

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना सुखरूप गावी पोहोचविण्यासाठी एसटी महामंडळाने कंबर कसली असून, ठाणे विभागातून तब्बल दोन हजार ५०० एसटी बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाला काही दिवस बाकी असतानाच ६८४ बसचे बुकिंग पूर्ण झाले असून त्यापैकी तब्बल ३७० बस विविध राजकीय पक्षाच्या मंडळींनी ग्रुप बुकिंगच्या माध्यमातून आरक्षित केल्या आहेत. त्यामुळे यंदाही कोकणवारीसाठी मोफत एसटीचा धडाका कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.

१४ सप्टेंबरला गणेश चतुर्थी असल्याने गौरी-गणपतीच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन ठाणे विभागाने सुरुवातीला २,५०० बसचे नियोजन केले आहे; मात्र गेल्या वर्षी २,६७१ बस कोकणात धावल्या होत्या. त्यामुळे यंदाही मागणी वाढल्यास नियोजित संख्येत आणखी भर पडण्याची शक्यता एसटी प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

मागील वर्षी राजकीय मंडळींकडून तब्बल १,२०० बसचे बुकिंग करण्यात आले होते. यंदा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत बससेवेची घोषणा केली जाते. यंदाही विविध भागांमध्ये मोफत एसटी प्रवासाचे फलक झळकू लागले आहेत. विशेषतः शिंदे सेनेच्या स्थानिक पदाधिकारी आणि नगरसेवकांकडून मोठ्या प्रमाणात ग्रुप बुकिंग केले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काही प्रभागांमध्ये गणेशभक्तांना कोकणात पाठविण्यावरून राजकीय स्पर्धाच रंगल्याचे चित्र आहे.

राजकीय मंडळींकडून ३७० गाड्यांची बुकिंग
गणेशोत्सवासाठी एसटीचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू झाले असून, आतापर्यंत ६८४ बसचे बुकिंग झाले आहे. यामध्ये ३१४ बस गणेशभक्तांनी स्वतः आरक्षित केल्या आहेत, तर ३७० बसचे बुकिंग राजकीय मंडळींकडून ग्रुप बुकिंगच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

या ठिकाणांहून सुटणार बस
ठाणे विभागातील खोपट, बोरिवली, भाईंदर, मुलुंड, भांडुप, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी आणि दिवा या प्रमुख ठिकाणांहून कोकणासाठी विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ठाणे विभागातून काही वर्षांत सोडलेल्या बसची संख्या
वर्ष कोकणात गेलेल्या बस
२०१८ ८२०
२०१९ ८२३
२०२० २२८
२०२१ ८४६
२०२२ १,३७२
२०२३ १,९५७
२०२४ २,४६५
२०२५ २,६७१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुकेश अंबानींची रिलायन्स आता आईस्क्रीमही बनवणार, अवघ्या १० रुपयांत लाँच केले प्रॉडक्ट, दिग्गज कंपन्याची उडाली झोप

Gokulashtami 2026: मोरपीस ते बासरी! जन्माष्टमीआधी घरात 'या' ५ वस्तू आणणे मानले जाते अत्यंत शुभ; जाणून घ्या वास्तू नियमावली..

Nutrition Week : वजन घटवण्यासाठी फायबर इतकं महत्त्वाचं का? AIIMSच्या डॉक्टरांनी सांगितलं ‘हे’ कारण

Manwat News : मानवत नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा ७ व्या दिवशीही कामबंद लढा कायम; तोडगा न निघाल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Mumbai Rain Update: मुंबईचं हवामान अचानक बदललं, मुसळधार पावसाची सुरुवात; कसा असेल पुढील २ दिवसाचा अंदाज?

SCROLL FOR NEXT