सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : स्वस्त दरात घर देण्याचे प्रलोभन आणि भांडवली बाजारामध्ये १२ टक्के मासिक व्याज मिळवून देण्याचे आश्वासन देत ६४ वर्षीय निवृत्त व्यक्तीसह त्यांच्या नातेवाईक व परिचितांकडून कोट्यवधी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अविनाश दगडू गायकवाड, कविता अविनाश गायकवाड आणि स्वराज छिंदलाल मलिक या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
कोलशेत येथे राहणारे दिलीप पाटील यांच्या तक्रारीनुसार, २०२२ मध्ये मानकोली येथील ‘स्मार्ट इस्टेट होम’ प्रकल्पाच्या जाहिरातीने प्रभावित होऊन त्यांनी कुटुंबीयांच्या नावावर आठ सदनिका आरक्षित केल्या. त्यासाठी ३५ लाख २२ हजार रुपये भरले; मात्र प्रकल्पाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. संशयितांनी शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास दरमहा १२ टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिल्याने पाटील व कुटुंबीयांनी तब्बल एक कोटी ८९ लाख रुपये गुंतवले. सुरुवातीला ९० लाख ६२ हजार रुपये परतावा दिल्यानंतर पैसे देणे बंद केल्याचे तक्रारीत म्हटले. पाटील यांच्या म्हणण्यानुसार, स्वतःची व नातेवाइकांची मिळून दोन कोटी २४ लाख, तर परिचितांची एक कोटी ७९ लाखांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.