मुंबई

रंगीबेरंगी मडक्यांनी श्रीवर्धनची बाजारपेठ सजली

CD

रंगीबेरंगी मडक्यांनी श्रीवर्धनची बाजारपेठ सजली
गोकुळाष्टमी, दहीहंडीसाठी गोविंदा पथकांची खरेदी; पारंपरिक मडक्यांसह आकर्षक नक्षीकामाला मागणी
श्रीवर्धन, ता. २ (वार्ताहर) : गोकुळाष्टमी आणि दहीहंडीच्या उत्सवाला काहीच तास उरल्याने श्रीवर्धन शहर व परिसरातील बाजारपेठांत सणाची लगबग वाढली आहे. दहीहंडीचे मुख्य आकर्षण असलेल्या गोविंदा पथकांसाठी तसेच घरातील पूजेसाठी आवश्यक असलेली विविध आकारांची, रंगीबेरंगी मडकी बाजारात दाखल झाली आहेत.
कुंभारवाड्यातील स्थानिक उत्पादकांनी दहीहंडीसाठी खास लाल मातीची मडकी तयार केली आहेत. पारंपरिक तांबड्या मडक्यांसोबत काच, टिकल्या, मोरपीस आणि चमकदार रंगांच्या नक्षीकामाने सजवलेल्या मडक्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. बालगोविंदा पथकांसाठी लहान आकाराची, तर मोठ्या मंडळांसाठी नक्षीदार मडकी उपलब्ध आहेत. पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्याने मडकी सुकवणे, भाजणे सुकर झाले असून, शहरासह ग्रामीण भागातील गोविंदा पथके आणि भाविक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत.
माती, रंग आणि साहित्य महागले
यंदा मडकी तयार करण्यासाठी लागणारी चांगल्या दर्जाची माती मिळवणे कठीण झाले आहे. तसेच वाहतूक खर्च, रंग आणि डिझाईन साहित्याच्या किमतीत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मडक्यांच्या किमतीत किरकोळ वाढ करावी लागली आहे. मात्र सणाचा उत्साह कायम असल्याने मडक्यांना चांगली मागणी मिळत असल्याचे उत्पादकांनी सांगितले.

प्रतिक्रिया :
गोकुळाष्टमीच्या दोन-तीन महिने आधीपासून आम्ही मडकी तयार करण्याचे काम सुरू करतो. यंदा पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने मडकी सुकवणे आणि भाजणे सुकर झाले. मात्र चांगल्या दर्जाची माती मिळवणे कठीण झाले असून, वाहतूक खर्च, रंग आणि डिझाईन साहित्याच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मडक्यांच्या किमतीत किरकोळ वाढ करावी लागली, असे मडकी उत्पादक रवींद्र करंजकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८ वर्षांत २४८ कोटी रुपये खर्च, मुंबईतील उड्डाणपुलावर भूकंपासारख्या भेगा; ३ महिन्यांत तिसऱ्यांदा वादाच्या भोवऱ्यात

Manoj Jarange Patil: ‘मागण्या मान्य करा, नाहीतर उडी घेऊ’; लातूरमध्ये मराठा तरुणांचा टोकाचा इशारा

Pune News : पुणे विद्यापीठासह तीन विद्यापीठांत आता ‘कुलपती पदक’; राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा धनादेश

Pune News : तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरीय फेऱ्यांसाठी निरीक्षकाची नियुक्ती होणार; त्रुटी आढळल्यास संस्थेवर कारवाई

Goa Extortion Row: काँग्रेस नेत्यावर खंडणीच्या आरोपांची छाया; गोवा वसुली प्रकरणाचे मुंबई कनेक्शन, नेत्यांच्या फोटोंवरून भाजपचा गंभीर दावा

SCROLL FOR NEXT