मुंबई

पुणे घटनेच्या निषेधार्थ केडीएमसीची स्थायी समिती सभा १० मिनिटे तहकूब

CD

मनसेबाबतची भाजपची मागणी कायम
स्थायी समिती सभा १० मिनिटे तहकूब; कोअर कमिटीच्या बैठकीत नाराजी

कल्याण, ता. २ (वार्ताहर) : पुण्याच्या घटनेनंतर कल्याण-डोंबिवली महापालिका भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. यात शिवसेनेने मनसेची साथ सोडण्याची मागणी कायम ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठविण्यात असून पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी माहिती उपहापौर राहुल दामले यांनी दिली. पुणे घटनेच्या निषेधार्थ केडीएमसीची स्थायी समिती सभा भाजप नगरसेवकांच्या मागणीनुसार १० मिनिटे तहकूब करण्यात आली. तर ही सर्व भाजपची नाटकं असून शिवसेना भाजप सत्तेशिवाय राहू शकत नसल्याची टीका काॅंग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी केली आहे.
पुणे येथील सरकारी महाविद्यालयात मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो उतरवल्यानंतर याचे पडसाद राज्यात उमटत असून कल्याणमध्येदेखील याची ठिणगी पडली आहे. केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपची युती असून शिवसेनेला मनसेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेने मनसेसोबतची युती तोडावी, अन्यथा भाजप सत्तेतून बाहेर पडून विरोधी पक्षात बसेल, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्षांनी मंगळवारी दिला होता. यानंतर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक केडीएमसीच्या उपमहापौर दालनात झाली. याला भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, आमदार सुलभा गायकवाड, कल्याण लोकसभा प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष नंदू परब, उपमहापौर राहुल दामले, सभागृह नेते वरुण पाटील, भाजप गटनेते शशिकांत कांबळे, नगरसेवक दीपेश म्हात्रे, महेश पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनेची साथ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो उतरवल्याच्या निषेधार्थ बुधवारी केडीएमसी मुख्यालयातील स्थायी समितीची सभा १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. भाजपने मांडलेल्या या तहकुबीला शिवसेनेने प्रतिसाद देत स्थायी समितीची सभा १० मिनिटे तहकूब केली. युती धर्म म्हणून शिवसेनेने साथ दिली असून, केडीएमसीत शिवसेनेसोबत मनसे युतीमध्ये आहे; मात्र शिवसेनेने मनसेसोबत युती तोडावी, ही आमची मागणी कायम असल्याचे भाजपच्या सदस्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकारकडून जरांगेंच्या मागण्या मान्य! प्रसाद लाड यांच्या हस्ते घेतलं पाणी, सलाईनही घेणार

Bidkin Bribe Case : टिपर सुरू ठेवण्यासाठी पोलिस हवालदाराची महिन्याला एक हजारांची मागणी; पोलिस हवालदारावर एसीबीच्या जाळ्यात

Maratha Quota Protest: मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक

IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते आता राम मंदिराचे नवे CEO, कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

SCROLL FOR NEXT