ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेटमध्ये फ्लॅटला आग
ठाणे, ता. २ : हिरानंदानी इस्टेट येथील कॅपरी को-ऑप. हौ. सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये बुधवारी दुपारी आग लागली. यात एसी युनिट, टीव्ही, लाकडी बेड, कपाट, कपडे इत्यादी साहित्य जळून नुकसान झाले. खोलीत राहणाऱ्या दोन महिला वेळीच बाहेर पडल्याने त्या सुखरूप आहेत. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे रेस्क्यू वाहन व जम्बो वॉटर टँकर, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. आगीचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.
............
नागला बंदर खाडीत मृतदेह आढळला
ठाणे, ता. २ : घोडबंदर रोड परिसरातील नागला बंदर खाडीत बुधवारी (ता. २) एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. याबाबतची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. खाडीत अंदाजे ३५ ते ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळला. पथकाने रेस्क्यू वाहनाच्या सहाय्याने मृतदेह खाडीतून बाहेर काढून कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात दिला. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.