मुंबई

दिशा सालियन प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

CD

दिशा सालियन प्रकरणाचा
तपास सीबीआयकडे

उच्च न्यायालयाचे गुन्हा नोंदवण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाचा तपास बुधवारी (ता. २) उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपावला. या वेळी न्यायालयाने सीबीआयला दिशाच्या वडिलांचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्याच वेळी सबळ पुराव्याशिवाय कोणालाही आरोपी ठरवू नये, असेही न्यायालयाने तपास यंत्रणेला बजावले.

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिचा मृत्यू आत्महत्या नसून, सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांचे वडील सतीश सालियन यांनी ॲड. नीलेश ओझा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. बॉलीवूड पार्टीमध्ये आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि इतरांच्या उपस्थितीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होताना दिशाने पाहिले होते. म्हणून सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा आरोप याचिकेत केला आहे. या याचिकेवर न्या. सारंग कोतवाल आणि न्या. रणजीतसिंह राजे भोंसले यांच्या खंडपीठाने सलग तीन दिवस प्रदीर्घ सुनावणीनंतर २८ ऑगस्टला निकाल राखून ठेवला होता. तो निर्णय बुधवारी जाहीर केला.

सहा वर्षांपासून याप्रकरणी गुन्हा दाखल न केल्याबद्दल न्यायालयाने मुंबई पोलिसांना धारेवर धरताना कोणत्याही व्यक्तीविरुद्ध वाजवी संशय घेण्याजोगी पुरेशी कारणे आहेत, असे तपास अधिकाऱ्याला वाटल्याशिवाय त्या व्यक्तीला आरोपी मानले जाऊ नये, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले. पोलिसांच्या तपासातील त्रुटींमुळेच अधिक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत होणे आवश्यक असल्याचे खंडपीठाने प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करताना प्रामुख्याने नमूद केले. इतकी वर्षे ‘अपघाती मृत्यू’ म्हणून या प्रकरणाकडे पाहिल्याबद्दल पोलिसांच्या तपासातील विसंगतीवरही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. पोलिसांच्या तपासातील अनेक त्रुटींमुळेच प्रकरणाचा योग्य आणि ठोस तपास करणे आवश्यक ठरते, असे न्यायालयाने स्पष्ट केले आणि न्यायालयाने प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे त्वरित सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश मालवणी पोलिसांना दिले. तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयच्या मुंबई विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.
-----
तपासानंतर अहवाल सादर करा!
सीबीआय अधिकारी दिशाच्या वडिलांचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करतील. दिशाचा मृत्यू ज्या परिस्थितीत झाला त्याच्याशी संबंधित सर्व पैलूंचा तपास हे अधिकारी करतील. तथापि, तपासात कोणताही गुन्हा घडल्याचे निष्पन्न झाले नाही, तर सीबीआयने संबंधित न्यायालयासमोर योग्य तो अंतिम अहवाल (समरी रिपोर्ट) सादर करावा, असे खंडपीठाने म्हटले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Quota Protest: मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक

IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते आता राम मंदिराचे नवे CEO, कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

SBIच्या ग्राहकांनो लक्ष द्या! 'या' दिवशी UPI सेवा राहणार बंद; आर्थिक व्यवहार करण्यासाठी दिला पर्याय

Pune Mobile Recovery : ओतूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; तांत्रिक तपासातून २५ गहाळ मोबाईल शोधून सहा लाख ५० हजारांचा मुद्देमाल मालकांना परत

SCROLL FOR NEXT