मुंबई

नवी मुंबईत रुग्णाला मुदत संपलेले सलाईन

CD

नवी मुंबईत रुग्णाला मुदत संपलेले सलाईन
प्रकृती चिंताजनक झाल्याने व्हेंटिलेटरवर, दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २ : नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका रुग्णाला मुदत संपलेले सलाईन लावल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या निष्काळजीमुळे रुग्णाची प्रकृती खालावल्याचा आरोप नातेवाइकांनी केला असून, त्यांना पुढील उपचारासाठी फोर्टिस रुग्णालयात व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. या प्रकारामुळे रुग्णालयाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.
तापाने चक्कर आल्यामुळे रुग्णाला महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी रुग्णाला सुमारे एक महिना मुदत संपलेले सलाईन लावले. सलाईन शरीरात गेल्यानंतर रुग्णाला त्रास सुरू झाला आणि प्रकृती अचानक बिघडली. औषधाची मुदत संपल्याचे निदर्शनास आल्यावर नातेवाइकांनी तत्काळ प्रशासनाकडे जाब विचारला. प्रकृती अत्यंत गंभीर बनल्याने रुग्णाला आयसीयूमध्ये व त्यानंतर व्हेंटिलेटरवर हलवावे लागले. सलाईन लावण्यापूर्वी रुग्ण चांगल्या स्थितीत होता; परंतु या निष्काळजीमुळेच त्यांचा जीव धोक्यात आल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. प्रशासनाने केवळ चौकशी समिती नेमण्याचा वेळकाढूपणा न करता, निष्काळजी करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका व साठा प्रभारी (स्टोअरकीपर) यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईक व नागरिकांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर पालिकेच्या वैद्यकीय प्रतिनिधींनी स्पष्टीकरण दिले आहे. रुग्णाला थंडी-तापाचा त्रास होत असल्याने दाखल केले होते. वैद्यकीय चाचण्यांच्या अहवालानुसार रुग्णाला डेंगीमुळे प्लेटलेट्स ४०,००० पर्यंत घसरल्या होत्या आणि फॅल्सिफारम मलेरियाचा गंभीर संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या आजाराच्या तीव्रतेमुळेच रुग्णाची प्रकृती चिंताजनक बनली असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. तथापि, मुदत संपलेले सलाईन अथवा औषध देणे हा गंभीर निष्काळजी असल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात येत असून, यात जो कोणी कर्मचारी किंवा अधिकारी दोषी आढळेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकारकडून जरांगेंच्या मागण्या मान्य! प्रसाद लाड यांच्या हस्ते घेतलं पाणी, सलाईनही घेणार

Bidkin Bribe Case : टिपर सुरू ठेवण्यासाठी पोलिस हवालदाराची महिन्याला एक हजारांची मागणी; पोलिस हवालदारावर एसीबीच्या जाळ्यात

Maratha Quota Protest: मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक

IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते आता राम मंदिराचे नवे CEO, कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

SCROLL FOR NEXT