गडकरींविरोधातील आक्षेपार्ह मजकूर हटवा!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : इथेनॉलमिश्रित इंधन धोरणाशी (ई-२०) संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरींबाबतचा आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे आदेश ‘एक्स’सह अन्य समाजमाध्यमांना बुधवारी (ता. २) पुन्हा एकदा उच्च न्यायालयाने दिले. या वेळी नवीन मजकूर हटवण्याचेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
मागील सुनावणीवेळी स्पष्ट आदेश देऊनही गडकरींबाबतचा काही आक्षेपार्ह मजकूर विशेषतः ‘एक्स’वरील मजकूर अद्याप हटवलेला नाही, असे न्या. आरिफ डॉक्टर यांनी स्पष्ट केले. तसेच ‘एक्स’ला याबाबत प्रतिज्ञापत्र आणि आदेशाच्या अंमलबजावणीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने ५ ऑगस्टला गडकरी यांनी याचिकेसह सादर केलेला सर्व आक्षेपार्ह मजकूर बदनामीकारक असल्याचे आढळून आल्यानंतर न्यायालयाने तो काढून टाकण्याचे आदेश दिले होते. तथापि, सुनावणीळी ‘एक्स’ने अद्याप त्या आदेशाचे पालन केले नाही, मात्र इन्स्टाग्रामसारख्या इतर समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर आधीच काढून टाकला आहे, असे गडकरी यांच्यावतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. न्यायालयाने त्याची दखल घेऊन ‘एक्स’ला गडकरी यांच्याविरुद्धचा सर्व आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याच्या पूर्वीच्या आदेशाचे पालन करण्याचे आदेश दिले आणि प्रकरणाची सुनावणी १६ सप्टेंबरला ठेवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.